🔺सायंकाळी 6.45 वाजेपर्यंत 182 नवीन कोरोना बाधीत

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोना आजारामुळे तिघांचा मृत्यू झाला. यात रामनगर चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरुष व मूल रोड चंद्रपूर येथील कबीर नगर येथील 56 वर्षीय महिला तसेच वडसा (जी.गडचिरोली) येथील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या तिघांनाही कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार होते.

आज गेल्या 24 तासात 182 नवीन कोरोना बाधीत्यांची भर पडली असून जिल्ह्यात आता पर्यतची बाधीत संख्या 2945 झाली आहे.

सविस्तर वृत्त काही तासात देण्यात येईल.

Breaking News, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED