३१अॉगस्टचे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर उघडण्यासाठीचे आंदोलन हे संविधानाने दिलेल्या ऊपासना स्वातत्र्याची होतं असलेली गळचेपी थांबविण्यासाठी होते,याची समस्त संविधानवादी जनतेनी नोंद घ्यावी…!!

पंढरपूर येथील मंदिर ऊघडा हे आंदोलन कुठल्याही एका धर्माशी संबंध जोडून त्याचा उल्लेख करणे किंवा त्या आंदोलनाचे आकलन मांडणे म्हणजे विविध धर्मांनी नटलेल्या भारत देशात आंदोलनाच्या परिणामांचे विश्लेषण करण्याच्या कोत्या बुद्धीचे लक्षण होय…!!

पंढरपूर येथील आंदोलनाने सर्वच धर्माची प्रार्थना स्थळे उघडण्याचा मार्ग आता मोकळा झाला यात शंकाच नाही…!!
त्यासाठी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहूजन आघाडी यांना धन्यवाद दिले पाहिजे…!!
प्रत्येक धर्माच्या प्रार्थना स्थळासाठी वेगवेगळा लढा ऊभा करुन शक्ती खर्च करणे आणि एकाच दणक्यात सर्वच प्रार्थना स्थळे उघडण्याचा मार्ग प्रशस्त करणे हा कामाच्या आवाक्याचा आणि नेतृत्वाच्या वैचारिक धाटणीचा परिणाम आहे…!!

मनुवाद्यांशी लढतांना नेतृत्वाच्या गुणांचा कस लागतो तो असा की, मनुवादी एक एक विकृती निर्माण करुन तुम्हाला ती निस्तारायला लावून तुमची सर्व शक्ती त्यातच खर्ची घालतात आणि ते इतरांच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील होतात,अर्थातच तुम्हाला प्रतिक्रिया वादी बनवून ते इतर कार्याला वाहून घेतात तुम्हाला त्यांच्यावर चढाई करण्यासाठी वेळ मिळतं नाही परिणामी तुम्ही माघारता…!!

आता सर्वच धर्मातील भाविक,भक्त किंवा आस्तिक तथा अनुयायी यांना पुन्हा पुन्हा त्यांची मंदिरे ऊघडली आता आमच्या मस्जिदी ऊघडा .??
किंवा चर्च बाबत दुजाभाव का.?? , बौद्ध विहारे उघडण्यासाठीचा ऊल्लेख नाही .??
किंवा गुरुद्वारा बाबत शासन केव्हा निर्णय घेईल .??
अशी मागणी करण्यासाठी आंदोलन करायची गरजच राहिली नाही, हेही समजून घ्या…!!

संवैधानिक अधिकारांची मुस्कटदाबी करुन हुकुमशाही वृत्तीला जनतेच्या मानगुटीवर बसविण्याची ही वैदिकांची अरेरावी थांबविण्यासाठी पंढरपूरात एका महान बंडखोराच्या(डॉ बाबासाहेब आंबेडकर.) नातवाने एल्गार पुकारला होता…!!
त्याची फलनिष्पत्ती म्हणजेच भारतीय माणसांच्या ऊपासना स्वातंत्र्याला बंदिस्त करून जी हुकुमशाही लादली जात होती ती हुकुमशाही झुगारून विविध धर्मांनी नटलेल्या भारतीयांना आपापलं उपासना स्वातंत्र्य बहाल करणे होय…!!
वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे मानवतावादी नेते आहेत,ते सर्व भारतीयांचे नेते आहेत म्हणून त्यांच्या आंदोलनाची तुलना संकुचित दृष्टिकोन ठेवून करणे म्हणजेच त्यांच्या वैचारिक भुमिकेवर अन्याय करण्यासारखे आहे…!!
वैदिक धर्मीयांनी सत्तेच्या अघोरी बहुमताच्या जोरावर इतर सर्वांनाच वेठीस धरायला सुरुवात केली आहे…!!
हिंदू, हिंदू म्हणून मते मिळविली आणि सत्ता हातात आल्यावर हिंदुची मंदिरे सुद्धा बंदिस्त करण्याची आणि हुकुमशाही वृत्तीने वागण्याची जी मुजोरी केल्या गेली, त्यामधून संवैधानिक उपासना स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे…!!
भारतीय माणसाचा उपासना स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेऊन ,सर्वांनाच गुलाम बनविणारी वृत्ती ठेचण्यासाठी राष्ट्रवादी विचाराचा नेता हा जात, आणि धर्माच्या पलिकडे जाऊन जनमाणसाच्या हक्काचा लढा लढतं असतो…!!
३१अॉगस्टचे पंढरपूरातील आंदोलन हे उपासना स्वातंत्र्य बहाल करण्यासाठीचे ऐतिहासिक आंदोलन होते याची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल…!!

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने सर
(राजकीय विश्लेषक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ मार्गदर्शक)
मो:-99602 41375

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185

अकोला, महाराष्ट्र, लेख

©️ALL RIGHT RESERVED