बायको भेटणे कठीण झाले

50

काहो शेषराव भौ ,
काय म्हणत शाम्या भौ .तुम्ही त काई दिसतच नाई इथल्यात तुमचा पाय काई घरात ना पुऱ्यात मी दोन येळा आलातो तुमच्या घराकळे .वैनीनं काई सांगतलं नाई वाटते ..कुटं जात असता हो तुम्ही ,
कुठसा त नाय ,
खरं सांगा आता मी चार गावचं पाणी पेणारा माणुस .माया पासून लपवता व्हय ,अहो श्याम भौ तुयापासून काय लपऊ मी मग सांगा कि ,
काय सांगु ,
कुठं जाता त ?
आता तु चार गावाचं पाणी पेणारा लाव तुचं अंदाज कुठं जातो त मी .
सांगु काय मग ?
” सांग न “तुम्ही जाता शेषराव भौ बंड्यासाठी पोरगी पायाले .
” हम्म ”
चाललो श्याम भौ घरी आता.
थांबा एक पोरगी हाय माया ध्यानात आपाल्या बंड्यासाठी ..माया साळवाची व्हय .
पण पयले तुम्ही सांगा बा तुम्हाले कशी पोरगी पायजे बंड्यासाठी .
“आता बंड्या माया लहानाचा मोठा तुया नजरेखालीच झाला श्याम भौ .अन तुले माहित हाय माई काय परिस्थिती हीय तं.अन् बंड्या कसा हाय तु पाय लय साधासुधा हाय हे सार्या गावाले माहित हाय .त्याले अन् सारं घर सांभाळणारी पोरगी पायनं चालु हाय भौ.अशीच पोरगी पायजे .आपला बंड्या गोरा हाय पण आपल्याले काया गोर्याचा काई फरक नाई पडत.पोरगी सावळी असली तं चालते पण कुटुंब बिनशौकिन ,माणुसकिच पायजे राजा श्याम्या भौ.
बरं बरं शेषराव भौ .मग तुम्ही आज ठावरक किती पोरी पायल्या हो .
म्या पायल्या श्याम भौ ,पंधरा – सोळा पोरी तं पायल्याच पायल्या .
मग ,तरी जमल नाई का हो ,
नाई ना भौ.पण पोरीच्या माय बापाची लय डिमांड हाय जो तो मने वावरच पायजे पोराच्या घरी .आता मले सांगा आपण भूमिहीन माणूस ,आपल्या घरी एक तास नाही कुटून आणू वावर .” तसंही कास्तकाराले तरी भेटून जाईन राजेहो पोरगी पण शेतमजुराले कास्तकारापेक्षाही कठीण काम झालं शेषराव भौ पोरगी भेटणं “.
हाव राजा श्याम भौ त्याच्यात पोरीच्या घरी वाकून जावा लागते कुटं कुटं घर नाई राहाले पण डिमांड
पोरगा काय करते ?
वावर किती हाय ?
सरकारी नोकरीवर हाय काय ?आमच्या मधातल्या बुवा नं पयलेच सांगते बर कंडिशन तरी अगाऊचे प्रश्न करतेच ते लय बिकट येळ हाय राजा आमच्या येळेस नव्हत असं .जे बाप म्हणे तेच करा लागे .तेच पोरगी.पाये ..
जमाना बदलला आता शेषराव भौ …..
आपल्या येळस बापाच्या देखता काय, आपल्या वडीलधारी गावातल्या कोणताई माणूस आला त पायातल्या वायना आपण घालो नाई .त्याच्या दूर नेऊनसण्या घालो .आता देखतच चड्डीतलं पोट्ट राजा तंबाखु आपल्याले मांगते .जमन्याबरोबर आपल्याले चाला लागते आता .काय करता ..
बर मग मी माया साळवाले विचारतो पोट्टीचं लगीन करते काय नाई करत त मग सांगतो तुमाले .जमणं ना …..
इचार बा तुया मतान ….चला मग येतो शेषराव भौ चौकातून ….बरं बरं तिकडे बंड्या दिसला तं देजो धाळून घराकळे …हाव
बंड्या ओय बंड्या ,
काय हो शाम्याकाका ?
तुले तुया बाप आवाज मारते रे आताच आलो तुया बापापासून म्हणे बंड्या दिसला तर पाठवजो म्हणे म्हणून सांगतो ….
बरं बरं श्यांमकाका जातो मी .
का बे बंड्या आले तुये बाबा आजई पोरगी पाऊन ..
कायच बे लेक हो , दररोज जाते बाबा पोरगी पायाले अन म्हणते तालच नाई लागत ..
काऊन काऊन ….पोरीवाले वावरच हाय काय मणते ना , जशी काई यायची पोरगी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वावरात जाते .धड इया नसणं पकळतपकळता आताच्या पोरीले ..
हाव ना राजा मायसोबत असंच व्हते बंड्या ….
ह्या चंद्याचं बरं हाय वावर हाय तं पावर हाय म्हणून सन्या दळाल पोरीवाले धडका मारते याच्या घरी …अन मी, तू गेलो यंदाही वाऱ्यावर …अन लोक सायचे तिकडे फुटकण्या फोडते ढोमण्यासारखे वाळले लग्नाचं वय झालंकाय सांड ठेवले काय गावात . राजा माया कानावर येते चंद्या सर्व पण काय करावं आम्ही शेतमजुरी करून खाणारे वावर ना धुरा आमच्यापाशी …..आता पायानं त्या अभ्याले अन कारण्याले घर नाही राहाले पण दोन एकर वावरावर पोरगी दिली त्याले अन आता पाय रोज दारू पिऊन मारते म्हणते बायकोले ,होईन होईन गडे हो तुमचं पण लगीन होईन ..
काय माईत चंद्या ह्या जन्मात तरी बायको भेटणं कठीणच वाटते राजा …..
चला येतो गळे हो बाबांन बोलवलं मने मघानी श्याम्याकाका चालतो भेटू नंतर …….

✒️लेखक:;विशाल इंगोले (अजातशत्रु )
मु.पो . चिंचोली काळे ,
ता .चांदुर बाजार ,
जि .अमरावती .
मो:-7498049376

▪️संकलन:- प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब) मो:-९४०४३२२९३१