टीम तरुणाईच्या सहकार्याने अर्हेरनवरगाव येथे आरोग्य शिबीर

15

🔸150 लोकांनी केली आरोग्य तपासणी

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.3सप्टेंबर):-मागील सतत तीन दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते.त्यामुळे कित्येक लोकांना पुराच्या पाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगराईचा सामना करावा लागत असून त्यापासून पूरग्रस्त लोकांना साथीचे रोग उद्भवू नये यासाठी टीम तरुणाई,ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “पूरग्रस्तांना एक मदतीचा हात” या ब्रीदवाक्या अंतर्गत डॉ. सौरभ लांजेवार,गजानन घुगे,प्रशांत राऊत,गोपाल करंबे यांच्या मार्गदर्शनात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव,पिंपळगाव लाळज,भलेश्वर,नांदगाव ,परडगाव ,सोंद्री,हरदोली आशा अनेक गावाला सतत तीन पुराणे विळखा घातला असून परिसरातील साथीच्या रोगांनी झपाटलेल्या लोकांना टीम तरुणाई च्या सहकार्याने आरोग्यविभाग व ग्रामपंचायत यांच्या मार्गदर्शनात आरोग्य शिबीर पर पडले असून सदर शिबिरात जवळपास 150 लोकांनी आरोग्य तपासणी करून औषधोपचार घेतला. कार्यक्रमाला डॉ. सौरभ लांजेवार,डॉ.जयश्री भोंगडे,ग्रामसेवक गजानन घुगे,सरपंच मनोज ढवळे,टीम तरुणाई जिल्हा समन्वयक गोपाल करंबे,तरुणाईचे प्रशांत राऊत ,आर.बी.राऊत आरोग्य सहाय्यक,को.डी. मेश्राम आरोग्य सहाय्यक,वृषाली वासनिक आरोग्य सेविका,आर.पी राऊत अरिग्या सेवक, वंदना मेश्राम नीना कऱ्हाडे प्रिया जनबंधु गीता वकेकर,दीप्ती बोरकुटे रावीता,मदनकर,सीताराम वकेकार.टीम तरुणाईचे कार्यकर्ते सुरज मेश्राम,प्रगती सेलोकर,वैभव तलमले,गायत्री सेलोकर,सुप्रिया घुगुस्कर,दिशा सेलोकर सहकार्य केले असून यशस्वीतेसाठी मंगेश करणकर,शुभम उरकुडे, अभिजित भागडकर,विशाल भेंडारे,संतोष राऊत,आकाश नागरीकर आदी गावकऱ्यांनी प्रयत्न केले.