वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70-30 कोटा रद्द करा

34

🔸मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्याय-दत्ता वाकसे

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.3सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात प्रवर्गनिहाय आरक्षण असतानाही प्रदेशिक आरक्षणाची 70-30 टक्के कोटा पद्धत राज्यात लागो केल्यामुळे मराठवाड्यातील आणि विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे ही कोटा पद्धती घटनेच्या विरोधात असल्यामुळे त्यामुळे तात्काळ सत्तर तीस कोटा रद्द करून मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्या होताना दिसत असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी तात्काळ रद्द करून मराठवाडा आणि विदर्भातील न्याय द्यावा अशी वडवणी तहसीलदार यांच्या यांच्यामार्फत मागणी करत धनगर समाज संघर्ष समितीने जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी निवेदन सादर केले आहे.

याबाबत वृत्तांत असा की आज राज्यामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया चालू आहे आणि 70 30 कोटा तात्काळ रद्द करावा त्यामुळे मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भ व उर्वरित महाराष्ट्राता वैद्यकीय महाविद्यालयात जास्त असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात वैद्यकीय प्रवेश मिळत आहे परंतु मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना गुण जास्त असूनही मराठवाडा विभागातील आणि विदर्भ विभागातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे या विद्यार्थ्यावर अन्याय आहे त्यामुळे 70 30 कोटा तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली आहे पुढे वडवणी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण 70 30 कोटा रद्द झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेशाबाबत एक वाक्यता राहील त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर होईल.

त्यामुळे तात्काळ कोटा रद्द करून मराठवाडा आणि विदर्भातील वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री महोदय कडे वेळ निवेदन सादर करू नये या मागणीला बगल दिली आहे परंतु सत्तर तीस कोटा रद्द नाही केला तर मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांसह मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर जन आंदोलन करणार आहे असे देखील दिलेल्या निवेदनात वाकसे यांनी म्हटले आहे.