🔺24 तासातील (सायंकाळी 7.15 वाजेपर्यंत) 222 नवीन कोरोना बाधीत

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.3सप्टेंबर):-जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोना आजारामुळे तीघांचा मृत्यू झाला. यात आझाद चौक,तुकुम चंद्रपूर येथील 67 वर्षीय पुरुष बाधीत 2 सप्टेंबरला,भानापेठ वार्ड चंद्रपूर येथील 48 वर्षीय पुरुष बाधीत 2 सप्टेंबरला रात्री उपचारादरम्यान तर रहमत नगर चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष हा 3 सप्टेंबरला सकाळी मृत्यू झाला.जिल्ह्यात आता पर्यंत 35 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात 222 नवीन कोरोना बाधितांची भर पडली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 3167 झाली आहे.

सविस्तर बातमी काही तासात देण्यात येईल.

 

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED