✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.3सप्टेंबर):-शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख श्री आनंदरावजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना यश, कीर्तीसह दीर्घ आयुष्य लाभो यासाठी दिनांक 3 सप्टेंबर 2020 गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता वसमत नगर येथील आसेगाव रोडवरील श्री साईबाबा मंदिर येथे महाआरती करून फराळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास नरवाडे यांच्या कडून करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, विधानसभा संघटक संभाजी बेले, तालुकाप्रमुख बालाजी तांबोळी, शहरप्रमुख काशिनाथ भोसले, युवासेना उपजिल्हाप्रमुख उद्धव सावंत,मा. उपसभापती वैजनाथ भालेराव, पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ शिरसागर, नगरसेवक धनंजय गोरे,मा. नगरसेवक राजू पवार, युवा सेना तालुका प्रमुख संदीप कातोरे, डॉ. धोंडीराम पार्डीकर, युवा सेना शहर प्रमुख धीरज कुलथे, उपशहर प्रमुख काशिनाथ भोपे, सोनू वाघमारे, सचिन कटेकर,मा.पं.स. सदस्य हनुमान दशरथे, सर्कल प्रमुख बापूराव अंभोरे, उद्धव मुळे, किशोर शेंडीउडवे,मा. सर्कल प्रमुख ज्ञानेश्वर काळे, युवासेना सर्कल प्रमुख केदार भालेराव, भीमराव भोसले, संतोष वंजे, विलास खंदारे, माधव सदगर तसेच शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी व व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED