🔹हिंगोलीचे खासदार श्री.हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

हिंगोली(दि.3सप्टेंबर):- कळमनुरी नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री शहरी घरकुल योजनेचा निधी मागील अनेक दिवसांपासून रखडलेला होता. याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून रखडलेला 178 घरकुलांचा 1 कोटी 6 लक्ष 80 हजार रुपयांचा दुसऱ्या हप्त्याचा निधी सातत्याने पत्रव्यवहार आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधून मंजूर करून घेतला. नगरपरिषद कळमनुरी यांना निधी प्राप्त झाला असून लाभार्थ्यांना निधीचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे. प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तींचे स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे.

या स्वप्नपूर्ती साठी कळमनुरी शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरुवात करण्यात आली. कळमनुरी नगर परिषद अंतर्गत घटक क्र.4 अन्वये 178 लाभार्थ्यांचा डी.पी.आर डिसेंबर 2018 मध्ये मंजूर करण्यात आला होता, त्याचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून मे 2019 मध्ये प्राप्त झाला होता. त्यानंतर काही कारणामुळे आणि नंतरच्या लोक डाऊन मुळे निधी रखडला होता. खासदार हेमंत पाटील यांनी यामध्ये लक्ष देऊन संबंधित विभागाला सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून तात्काळ निधी मंजूर करावा अशी मागणी केली, आणि याबाबत नगरपरिषदेने सातत्याने पाठपुरावा करून अहवाल सादर करावा असे सांगितले होते. पहिल्या टप्प्यात 178 लाभार्थ्यांना 71 लक्ष 20 हजाराचा निधी राज्य शासनाकडून मिळाला होता आणि नगरपरिषदेकडून तात्काळ वाटप करण्यात आला होता. मात्र उर्वरित दुसऱ्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांना वाट पाहावी लागली. यामध्ये खासदार हेमंत पाटील यांनी लक्ष घालून 1 कोटी 60 लक्ष 80 हजाराचा निधी मिळवून दिला. खासदार हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदार संघाचा सर्वांगिन विकास या उद्देशाने चंग बांधून कार्य करत आहेत. घरकुल निधीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, म्हाडा गृहनिर्माण संस्था यांना कोरोणा आणि लोकडाऊन च्या काळात सातत्याने पाठपुरावा केला होता. या सर्व बाबी चे फलित म्हणून शहरातील घरकुलांचा रखडलेल्या निधी प्राप्त झाला.

लवकरच कळमनुरी नगरपरिषदेकडून लाभार्थ्यांना देयकाची वाटप करण्यात येणार आहे आणि केंद्र सरकारच्या निधीसाठी सुद्धा खासदार हेमंत पाटील पाठपुरावा करणार आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांनी दिली. कळमनुरी शहरात राहणाऱ्या गरीब माणसांचे घरांचे स्वप्न खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे पूर्ण होणार आहे. याबाबत घरकुल लाभार्थ्यांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED