

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114
गेवराई(दि.3सप्टेंबर):-भाजप आमदार सुरेश धस हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाना तऱ्हेचे मार्ग निवडतात. कधी ढोली बाजा तर कधी मै हूं डॉन… गाण्यावर ते थिरकतांना आपण पाहिलच असाल. मात्र धसांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनलाय. आ. धस यांनी एका बँक मॅनेजरचे पाय धुतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. एसबीआय बँकेच्या हरिणारायन आष्टा येथील मॕनेजरने पीक कर्जाचे फाईल मंजूर केल्या नाहीत. म्हणून धस यांनी मॕनेजरला स्वतःच्या बंगल्यावर बोलावून घेतले, आणि तिथं त्यांचे पाय धुवून एकेरी भाषेत समज दिली. या प्रकरणामुळे धस यांची दादागिरी पुन्हा एकदा उजेडात आलीय.