तालुका काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी कडून पूरग्रस्तांना भोजन व्यवस्था

16

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.4सप्टेंबर):- वैनगंगा नदीला पूर येऊन गेला आणि लोकांची घरे उध्वस्त करून गेला, तरी सध्या स्थितीत लोकांनी आपल्या राहण्याची व्यवस्था सभामंडपात, मंदिरात , व उंच सुरक्षित ठिकाणी केली आहे. या सर्व पूरग्रस्त भागातील लोकांची गरज बगता ना. विजय वडे्टीवार साहेब ( पालक मंत्री चंद्रपूर जिल्हा तथा पुनवर्सन मंत्री म. रा.) यांनी पूरग्रस्त रा.अर्हरनवगाव येथील गावकऱ्यांना स्वतः जाऊन भेट दिली, सर्वांना शक्यतो लवकरात लवकर मदत करू असे आश्वासन दिले.

व सद्या ची परिस्थिती बागता,जेवणाच्या खर्चाला नगद्द आर्थिक मदत देवून,घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितल.हे सर्व देखरेकीच काम अर्हेर नवरगाव चे उपसरपंच व काँग्रेस चे धडाडीचे कार्यकर्ते वामनराव मिसार यांनी योग्य रित्या पार पाडलं व पूरग्रस्तांना ना. विजय वडे्टीवार यांनी समोरच्या जीवनाला शुभेच्या देवून निरोप घेतला.