पत्रकारितेतील “चौफेर” व्यक्तिमत्त्व बाबु भैय्या गर्जे आता वंचित बहुजन आघाडी साठी गरजनार-प्रा.शिवराज बांगर

    45

    ?वंजारी समाजाचे आक्रमक नेते” बाबु भैय्या गर्जे यांनी घेतला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

    ✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697

    माजलगाव(दि.4सप्टेंबर):-दैनिक बीड चौफेर चे संपादक आणि आष्टी तालुक्यातील “वंजारी समाजाचे आक्रमक नेते” बाबु भैय्या गर्जे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सर्वव्यापी नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच युवकांचे नेते सुजात भाई आंबेडकर यांच्या नेतृत्वावर भारावून जाऊन बीड जिल्ह्याचे कृतिशील जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.

    येणाऱ्या काळामध्ये आष्टी तालुक्यातील झुंडशाही आणि गुंडशाही मोडून काढत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा विधानसभेवर फडकवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे या प्रवेश प्रसंगी जिल्हा महासचिव सचिन मेघडंबर बाळासाहेब वाघमारे डॉ.केशवदास वैष्णव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.