अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन केले पंचनामे

33

🔹स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऋषीकेश राऊत यांनी केली झालेल्या नुकसानीची पाहणी

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.4सप्टेंबर):-मोर्शी तालुक्यातील सोयाबीन पीक पूर्णतः खराब झाल्याने शेतकरी पुरता खचला असतांना आता संत्रा व मोसंबीवर नवीनच संकट आले आहे.वरुड मोर्शी तालुका विक्रमी संत्रा पिकासाठी प्रसिद्ध आहे  पण  विविध रोगांमुळे संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.  आता संत्रा मोसंबीवरही अज्ञात रोगाने आक्रमण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात फळाची गळती होत आहे. या रोगाचे नियंत्र कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.संत्रा व मोसंबीचे फळ गळ* *मोठ्या प्रमाणात होत* *असल्यामुळे शेतकरी *अडचणीत सापडला असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऋषीकेश राऊत यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दखल घेऊन कृषी विभागाचे अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व तात्काळ पंचनामे करून  शासनाने शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऋषीकेश राऊत यांनी केली आहे.

वरुड तालुक्यातील मौजा मेंढी, घोराड, गाडेगाव येथील शेतकरी प्रतिभा राऊत, संजय राऊत, रामचंद्र जिचकार, वैभव पाचपोहर तसेच राजाभाऊ सोनारे प्रवीण साबळे यांच्या शेताची पाहणी केली असता सततच्या पावसामुळे मोसंबीची अनेक झाडे वाहून गेली असून मोसंबी , संत्राला गळती लागली तसेच कपाशीचे तुरीचे व* *सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे.* *त्याचप्रमाणे सर्वच शेतकऱ्यांच्या संत्रा मोसंबीचि गळ ही मोठ्या प्रमाणात दिसून आली त्यामुळे वरुड तालुक्यातील शेतकरी हा हवालदिल झालेला आहे यांचा पंचनामा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऋषिकेश राऊत   त्यांनी वरुड तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी संतोष सतदिवे,  कृषी अधिकारी पंचायत समिती वरुड सुनील देशमुख,  मुख्य मंडळ अधिकारी कृषी श्री व्ही एन अंभोरे कृषी पर्यवेक्षक श्री माहुरे, कृषी सहाय्यक श्री भातुरकर,  कृषी सहाय्यक गोलमाल, तलाठी इत्यादी अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता शेतकऱ्यांनी सर्व परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली लगेच त्यांनी पंचनामे करून शासनास माहिती  देऊ आणि शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचण्याचे आश्वासन दिले शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऋषीकेश राऊत,सागर राऊत, सचिन सावरकर भास्करराव मोरे रुपेश बांबल निखिल सोनारे अरुण कुसरे वैभव पाचपोहर प्रवीण साबळे सुनील काकडे राजा दाभाडे रोशन सोनारे रोशन माटे राजाभाऊ सोनारे बंडू पंत पाटील योगेश काकडे , दिनेश राऊत, संदीप राऊत सर्व शेतकरी उपस्थित होते. वरुड तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऋषिकेश राऊत यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, नुकसान दाखवून शासनापर्यंत पोहचविण्याचे काम केले त्याबद्दल गाडेगाव येथील शेतकऱ्यांनी ऋषीकेश राऊत यांचे आभार व्यक्त केले.