खडसंगी वीज उपकेंद्र परीसरात कृषी वीजपुरवठा दिवस पाळीत करा

39

🔸शेतकऱ्यांची मागणी,अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

🔹प.स.सदस्य अजहर शेख यांच्या नेतृत्वात निवेदन

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.4सप्टेंबर):-तालुक्यातील खडसंगी वीज वितरण उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या बावीस गावातील कृषी पंपाचा वीजपुरवठा बदल करून दिवसाच्या वेळेत सुरू करावा अश्या मागणीचे निवेदन खडसंगी पंचायत समिती क्षेत्राचे सदस्य अजहर शेख यांच्या नेतृत्वात परिसरातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कार्यालयात दिले आहे.

खडसंगी उपकेंद्र अंतर्गत येत असलेल्या परिसरात कमी प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने कृषी पंप धारक शेकऱ्यांना पिकांना सिंचन करणे आवश्यक झाले आहे.खडसंगी परिसर ताडोबा व्याघ्रप्रकल्पालगत असल्याने शिवाराच्या परिसरात घनदाद जंगल आहे. या मुळे शिवारात नेहमी हिंस्त्र प्राण्यांचे दर्शन होत असते. मागील काही काळापासून वीज वितरण कंपनीने कृषी पंपाना रात्र पाळीत वीज पुरवठा सुरू केला असून या मुळे वेळी अवेळी शेतकऱ्यांना शिवारात जावं लागतं आहे. असाच प्रकार करताना काही शेकऱ्यावर वन्यप्राणी हल्ले केल्याच्या देखील घटना परिसरात घडल्या आहेत.
खडसंगी परिसर इको सेन्स्टिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट झाल्याने जंगल परिसरात शेती असणाऱ्या शेकऱ्यांना रात्री च्या वेळात जाताना वनविभागाकडून अटकाव करण्यात येतो त्यामुळे हा कृषिपंपाचा वीज पुरवठा वेळापत्रक बदलवून दिवसाच्या वेळात सर्व कृषी पंप धारकांना वीज पुरवठा देण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना खडसंगी वीज वितरण उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता प्रविन असोलकर यांचे मार्फत देण्यात आले आहे या सह याची प्रतिलिपी आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांना सुद्धा देण्यात आली.मागणीची योग्य वेळेत दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदन देताना पंचायत समिती सदस्य अजहर शेख,बबलू पाटील थुटे व इतर शेतकरी उपस्थित होते.