तुकुम येथे गुणवंत विद्यार्थी व कोरोना योद्धाचा सत्कार सम्पन्न

    57

    ✒️चंद्रपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.4सप्टेंबर):-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल चंद्रपुर यांचे वतीने पंचवटी लान तुकुम येथे गुणवंत विद्यार्थी व कोविड योद्धाचा सत्कार सामारोह 25 आगष्ट रोजी सम्पन्न झाला.कार्यक्रमासाठी प्रमुख व्यक्ति म्हणून राष्ट्रवादी जिल्हादयक्ष राजेन्द्र वैध, दलित मित्र व आदिवासी लेखक डी, के,आरीकर, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष हीराचंद बोरकुटे, सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर उपस्तित होते, कार्यक्रमाचे संचालन सौ, रानी एलेकर तर कार्यक्रमची प्रस्तावना रानी राव यानी केली.

    कार्यक्रमात डॉ, अमित जैसवाल, डॉ, विजय निरंजने, डॉ, सम्यक दुधे, डॉ, अभिलाषा गावतुरे, यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला, कार्यक्रम करिता पंकज पवार, माणिक लोनकरे, प्रदन्या पाटिल, व अन्य कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.