आठ जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत करा

12

🔹उपविभागीय अधिकार्यानमार्फ़त मुख्यमंत्रयाना निवेदन सादर

🔸 राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर शाखेची मागणी

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.4सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यातील कमी केलेले इतर मागास वर्ग प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, असि मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमुर्च्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फ़त मुख्यमंत्रयाना पाठविन्यात आलेल्या निवेदनात केली आले.

राज्यातील चंद्रपुर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, रायगड, जिल्ह्यातील आरक्षण 13 आगष्ट 2002 च्या परिपत्रकानुसार वर्ग क व वर्ग ड या पदाकरिता आरक्षण कमी केले असुन 19 नोव्हैम्बर 2003 रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अप्लीकेशन अनवये रिक्त पदे रेडियो, टीव्ही वर प्रसिद्ध करुण अर्ज मागविन्यात यावे असे आदेश देण्यात आल्यामुले इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत होने आवशक्य होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयपूर्वी जिल्ह्य निवड समितिमार्फत पदे भरण्यात येत होते, त्यावेळी त्यांच् जिल्ह्यातील उमेदवाराणा अर्ज करता येत होता, त्यांच् जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवाराना फ़ायद्या होत होता, परंतु जिल्ह्य नियोजन समित्या बर्खास्त करण्यात आल्या त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवाराला कोणत्याही जिल्ह्यात अर्ज करता येत असल्यामुळे त्या जिल्ह्यातील उमेदवाराला कोणताही फ़ायद्या होत नाही, तरी शासनाने 8 जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण वाढविने गरजेचे आहे, आरक्षनासाठी स्थापन झालेल्या उपसमितिने लवकरात लवकर निर्णय घेऊन इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण पूर्वत करण्यात यावे असि मागणी निवेदनातून केली आहे.

या वेळी जिल्ह्य कर्मचारी महासंघचे रामदास कामडी, धर्मदास पानसे, कवडू लोहकरे, तालुका महासंघाचे अध्यक्ष गजानन अगड़े, कार्याध्यक्ष कीर्तिकुमार रोकड़े, पंचायत समिति सदस्या भावना बावनकर शहर अध्यक्ष किशोर भोयर, अविनाश अगड़े, रामभाऊ खडसिंगे, योगेश थूटे, अक्षय लांजेवार, भूषण काटकर, उपस्तित होते.