सिरसाळा ग्रामपंचयतला ग्रामस्थांकडून आर्थिक बळ

  41

  ?पाच दिवसात 3 लाख 63 हजार नळ पट्टी वसूल

  ✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

  सिरसाळा(दि.4सप्टेंबर):-गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिरसाळा ग्रामपंचयतचे सरपंच अश्रूबाई किरवले ,सरपंच प्रातिनिधी राम किरवले, ग्रामसेवक अब्दुल्ला शेख यांनी गेल्या आठ महिन्यापासून पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर गावातील विविध कामे मूलभूत सुविधा आणि विकास कामे करण्यास अग्रेसर ठरले आहे यामुळे सिरसाळ्यातील ग्रामस्थांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कार्याची वाह वाह होत आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की सिरसाळा गावाच्या इतिहासात आज पर्यंत कोणत्याच सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गावाच्या विकासाबद्दल कधीच पाऊले उचलले नव्हते परंतु या दोघांच्या परिश्रमामुळे गावातील विविध विकास कामे जलद गतीने होताना दिसत असल्यामुळे चक्क नागरिकांनाच ग्रामपंचयतला आर्थिक बळ देऊन नळ पट्टी भरण्याच्या माध्यमातून सहकार्य करत असल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे सिरसाळा गावाला महिना दोन महिने पाणी पुरवठा होत नसे परंतु किरवले यांनी आठ महिने विविध कामे करून महिन्यातून चार वेळेस नळाला पाणी पुरवठा उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे सिरसाळयातील नागरिकांना टँकर द्वारे पाणी100 रुपये प्रमाणे विकत घ्यावे लागत होते परंतु ग्रामपंचायतीने 100 रु महिना नलपट्टी आकारणी दर ठेवल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

  त्यामुळे नागरिकांनीच ग्रामपंचायतच्या निर्णयाचे स्वागत करत पाच दिवसात 3लाख64 हजार रुपये कर वसुली ग्रामपंचयतला देऊन एक प्रकारे आर्थिक बळ दिले असल्याचे दिसत आहे तर नाग्रीकांच्या प्रतिसादामुळे ग्रामपंचायतला विकास कामे करण्यास प्रेरणा मिळेल असे मत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी व्यक्त केले आहे.