एसपींचा आणखी एक दणका, दहशत निर्माण करणारे तीन गुंड दोन वर्षांसाठी हद्दपाऱ

    41

    ✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

    बीड(दि.4सप्टेंबर):-जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बीड शहरामध्ये नेहमी दहशत निर्माण करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे अशा प्रकरचे गुन्हे दाखल असणार्‍या तीन गुंडांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केली. प्रदिप रामेश्वर सौदा (रा.बलभीमनगर ता.जि.बीड), शालींदर रामेश्वर सौदा (रा.वातरवेस बलभीमनगर ता.जि.बीड) व सुमित सुर्यकांत उर्फ बाबुराव नलावडे (रा.शाहुनगर ता.जि.बीड) असे हद्दपार केलेल्या आरोपीचे नावे आहेत.

    या गुंड प्रवृत्तीच्या आरोपीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-56 प्रमाणे प्रस्ताव प्रभारी आधिकारी यांनी तयार करुन पोलीस अधीक्षक, बीड यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवल्यानंतर कायदेशीबाबी पुर्ण करुन झाल्यानंतर तिघांचे हद्दपारीचे आदेश काढले. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भरत राऊत, पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील, बीड ग्रामीण पोलीस ठाणे सपोनि.सुजित बडे यांनी केली आहे. भविष्यातही गुंडगिरी करणारे व कायद्याला न जुमानणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.