आजची स्त्री आणि स्वातंत्र्य

14

आजची स्त्री ही मनमोकळेपणाने जगते का ? हा पहिला प्रश्न पडतो, तर ती स्त्री आजही समाजात मान वर करून बोलत नाही. का तुम्ही कधी तीला विचारलं का ?
स्त्री आजही आपल्या घरात स्वतंत्र्यपणे राहू शकत नाही, अजूनही तीला एका गुलामाची वागणूक देतात. ज्या स्त्री ने जगाला शिवबा दिला, त्या जीजाऊ आईसाहेब पण आज एका स्त्री ला मुलगा झाला नाही म्हणून तीचा किती छळ केला जातो. ती कितीही कतृत्वान असली तरी पण तीचा जीव या समाजात घुसमटत असतो. कारण तीला आजही या आपल्या समाजात स्वातंत्र्य दिलं जात नाही.

प्रत्येक पुरषामागे एक स्त्री असते, मग तीच कतृत्व का तुम्ही लपवून ठेवता. का तीला मोकळा श्वास घेऊ देत नाही ? जगू द्या तीला तीच्या मनाप्रमाणे “पसरवू दे पंख त्या आकाशी, लढू दे तीला समाजाशी” स्त्री ही केवळ चूल आणि मुल यामध्ये अडकून न राहता, तीला जगण्याची उमेद दिली पाहिजे. अजूनही तीला घाणेरड्या नजरेने पाहिले जाते, का स्त्री मान उंचावून नाही फिरू शकत, का तीला अजूनही बंधनात अडकून ठेवले जाते ?
आजच्या काळात स्त्रीयांना आहे, नाही असं नाही पण खरचं सर्व स्त्रीयांना स्वातंत्र्य आहे का ? कारण आजही ग्रामीण भागात स्त्री ही अनेक जबाबदाऱ्यांनी बांधली गेली आहे.तर काही भागात स्त्रीया परंपरेच्या स्वाधीन आहेत.
आजच्या स्त्री ला आपल्या खाजगी जीवनात स्वातंत्र्य प्रस्थापित करणे गरजेचे आहे. स्त्रीयांनी सक्षम बनले पाहिजे, स्वत:चे अस्तित्व निर्माण केले पाहिजे.

स्वातंत्र्य म्हणजे काय तर देशात राहणाऱ्या प्रत्येक स्त्री ला तीच्या स्वविचाराचे स्वातंत्र्य असणे.स्वत:चे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असणे,स्त्री चा सन्मान हाच तीचा दागीना आहे.
समाज हे एक चक्रव्यूव्ह आहे, त्यातून स्त्री कधीच बाहेर पडत नाही. म्हणून आजच्या स्त्री ने आपल्या कतृत्वासाठी स्वातंत्र्य झाले पाहीजे.आणि समाज, देश यांना कळलं पाहिजे. कि स्त्री स्वातंत्र्य असणे ही सुद्धा एक बलाढ्य देशाची निशाणी आहे.

✒️लेखिका:-कु. स्वप्निता कमलाकर आंबेरकर
                  ता. गुहागर जि. रत्नागिरी

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620