

नवा मानव घडवण्या,
ज्ञान पेरतो मनात.
मोलाचे शिक्षण देऊनी,
आदर्श घडवतो जगात ||१||
जुने ते सोने मानुनी,
नवचैतन्याची धरतो आस.
राष्ट्राचा मजबूत पाया बनवण्या,
जोडतो विज्ञानाची कास ||२||
अज्ञानाच्या अंधाराला,
दुर सारतो क्षणात.
नवनवे शोध लावतो,
गुरुचे स्थान मनात||3||
स्वावलंबनाचे धडे गिरवत,
आदर्श घडवतो गावात.
भारताचे भवितव्य घडवतो,
शोध घेवूनी मुलांत||४||
संविधानिक मुल्य रुजवितो,
छोट्या छोट्या मुलांत.
भोंदूगिरी चा पर्दा फाडतो,
प्रयोग दाखवून क्षणात ||५||
मूल्यशिक्षण काळाची गरज,
आणिबाणीच्या काळात.
धैर्य खचु नच देता,
हिमतीने जगावे जगात ||६||
शिक्षक ज्ञानवंत असतो,
शिक्षक आधारस्तंभ असतो.
समस्येच्या विळख्यातून सुटाया ,
नवे संशोधन ही करतो||७||
ज्ञानाच्या तेजाने दुर सारतो,
अंधश्रद्धेचा अंधकार.
गुणदोष तपासून सुधारणा करतो,
करतो राष्ट्राचा उद्धार ||८||
✒️लेखिका:-सौ.जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
मो:-9423414686