

🔸माणूसकी च्या प्रथम शाखेचे ऊद्घाटन
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)
मो:-7757073260
नांदेड(दि.5सप्टेंबर):- पाटोदा येथे गावकऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री संभाजी आलेवाड सर यांच्या हस्ते “माणुसकी” या सेवाभावी संस्थेच्या शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
उच्चविद्याविभूषित इंजिनीयर राजेश ढवळे यांना शिक्षणासोबतच समाज कार्यातही रुची आहे, त्यांच्याच संकल्पनेतून “माणुसकी” या सेवाभावी सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली. आणि मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात ज्या ठिकाणी नैसर्गिक संकटे आलेली आहेत, तेथील पीडित लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी वारंवारपुढाकार घेतला आहे. मागच्या वर्षी आलेला प्रचंड पुराने जी क्षेत्रे बाधित झाली होती तिथे माणुसकी संस्थेने लोकांच्या दुःखाची नाळ ओळखत अनेक ठिकाणी मदत कार्य केलेले आहेत. तसेच सध्याच्या कोरोनाच्या काळात माणुसकी संस्थेने अनेक ठिकाणी लोकांना जागृत करत रोगा विरुद्ध लढण्यासाठी संस्थेने मदतीसह बळही दिलेले आहे. राजेश ढवळे हे व्यवसायानं इंजिनियर आहेत वकिलीचे शिक्षण ही त्यांनी घेतलेले आहे त्यासोबतच त्यांना समाजकार्याची आवड आहे त्या अनुषंगाने त्यांनी माणुसकी या संस्थेची स्थापना केली आहे आज त्यांचे मूळ गाव पाटोदा याठिकाणी माणुसकी संस्थेच्या फलकाचे अनावरण शिक्षणयात्री, शिक्षणप्रसारक व अतुलनीय कामगिरीमुळे ज्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे असे दूरदृष्टीचे व्यक्तीमत्व संभाजी आलेवाड सरांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन साहेबन शेख सर यांनी केले. या कार्यक्रमास उपसरपंच विश्वंभर ढवळे, पोलीस पाटील चक्रधर देशमुख, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रंगराव पाटील शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील हंबर्डे, यांसह गावातील पंडित पाटील हंबर्डे, ज्येष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे, राजेश ढवळे यांचे वडील दिगंबरराव ढवळे यांसह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.