सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यकारी अभियंत्याचा अकार्यक्षमपणा

60

🔹32 लाखाचा निधी परत मागवला

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बिड(दि.5सप्टेंबर):-सर्व शिक्षा अभियानांतर्गत माध्यमिक शिक्षण विभागासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने समग्र शिक्षा अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत बीड जिल्ह्यातील काही शाळासाठी बांधकाम आणि फर्निचर यासाठी आलेला 32 लाखाचा निधी या अभियानाचे कार्यकारी अभियंता यांनी वेळेत न खर्च केल्यामुळे राज्य सरकारने परत मागवला आहे. समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता यांनी वेळेत हा निधी खर्च करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍याकडे प्रस्ताव सादर केला आहे.

ज्या शाळेसाठी हा निधी खर्च करायचा आहे, त्या शाळेतील अंदाज पत्रके ही आपल्या खाली काम करणार्‍या अभियंत्याकडून मागवले नाही. अनेक ठिकाणी या अभियंत्याने वेळ काढु पणा केला. या बाबत अनेक तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकार्‍याकडे झाल्यामुळे काही प्रकरणामध्ये या अभियंत्याची सुनावणीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली आहे. या 32 लाखातून जिल्ह्यातील काही शाळांची कामे झाली असतील मात्र फक्त कार्यकारी अभियंत्यांचा अकार्यक्षमपणा आणि हलगर्जीपणा हा निधी परत जाण्यासाठी कारणीभुत पडला आहे. यामुळे किमान शिक्षण सभापती आणि शिक्षण समिती यांनी लक्ष घालून जो काही कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर तुटपुंजा निधी विकास कामासाठी येतो तो निधी परत जावू देवू नये अशी मागणी शिक्षणप्रेमी नागरिकातून होत आहे.