✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वर्धा(दि.5सप्टेंबर):-महाराष्ट्रात खाजगी माध्यमिक शिक्षकांचे व्यवस्थापन आधिनियम १९७७ व नियमावली १९८१ प्रमाणे चालते. माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता नियम १२ अनुसुची फ परिच्छेद २ प्रवर्ग क मधील ४ मुद्दे व टिप १ ते१० प्रमाणे ठरवावी असे दिले आहे, त्या नुसारच डी एड शिक्षक पदवी नतंर प्रवर्ग क मध्ये जातो.

तशा प्रकारचे परिपत्रक राज्याचे राज्य शिक्षणमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या निर्देशानुसार व अवर सचिव यांच्या परिपत्रक दि३/५/२०१९ व पत्र दि १९/१०/२०१९ च्या अनुषांगाने अमरावती विभागाचे उपसंचालक ए एस पेदोंर साहेबानी त्यांच्या पाच जिल्हयासाठी काढले आहे .तसेच स्पष्ट परिपत्रक अवर सचिवांनी किंवा उर्वरित उपसंचालकांनी काढून संपूर्ण महाराष्ट्रात अमंलबजावणी करावी व डी एड पदवीधर शिक्षकांना न्याय दयावा .टिप २,५ व ८ चा वापर करून सामाईक सेवाजेष्ठता करावी .महाराष्ट्रातील शिक्षणाधिकाऱ्यांमध्ये सेवाजेष्ठता व पदोन्नोती बाबत एकवाक्यता असावी .यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघाच्या शिक्षकांनी शिक्षकांच्या सन्मानाच्या दिवशीच संपूर्ण महाराष्ट्रात घरात राहून लाक्षणिक उपोषण केले. प्राप्त माहिती शिक्षक व महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पद्मा तायडे यांनी दिली.

या उपोषणात समस्त महाराष्ट्रातील हजारो शिक्षक सहभागी झालेत.कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड ,महासचिव बाळा आगलावे , उपाध्यक्ष राजेंद्र मसराम,व सर्व विभागीय सचिव व सर्व पदाधिकारी यांनी व सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व विविध जिल्ह्यांतील शेकडो शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

आज महाराष्ट्रातुन हजारो शिक्षकांनी आपला सहभाग या उपोषणात नोंदवला.वर्धा जिल्हा अध्यक्ष रेखा जुगणाके, सचिव अनिल आमझरे ,सावित्री नाखले, संगीता बोरगमवार, गजानन खराबे,लता हेडावू,किरण पांडे, उर्मिला चौधरी, निर्मला निखारे,विजय जुगणाके,अंजली कांबळे,संदिप पुनसे अशा अनेक शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED