भाजपच्या पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख पदावर बाबुरावजी कोहळे यांची नियुक्ती

24

✒️संतोष संगीडवर(आल्लापली,विशेष प्रतिनिधी)मो:-7972265275

गडचिरोली(दि.5सप्टेंबर):-भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा दिशा समितीचे सदस्य मा श्री बाबुरावजी कोहळे यांची भाजपच्या पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री बाबुरावजी कोहळे हे गेल्या 30 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीत सक्रिय असून त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात भाजपचे संघटन वाढविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांनी तेव्हापासून पक्षासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळेच जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा आलेख वाढलेला आहे. त्यांच्या या सेवाभावी व पक्षहितार्थ कार्याची दखल घेऊन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांची नियुक्ती पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख पदावर केलेली आहे.

भारतीय जनता पार्टीसाठी तन, मन धनाने कार्य करणारा मी एक सच्चा कार्यकर्ता असून यापुढेही गडचिरोली जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील संघटन मजबूत करण्यावर आपण भर देणार असून सर्व जिल्ह्यात संपर्क दौरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच त्यांच्या नियुक्तीबद्दल प्रदेश अध्यक्ष तथा पक्षश्रेष्ठींचे त्यांनी आभार मानले आहे.

त्यांच्या नियुक्ती बद्दल खासदार अशोक नेते , भाजपचे जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार कृष्णाजी गजभे, आमदार डॉ देवरावजी होळी, ज्येष्ठ नेते माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे, जिल्हा महामंत्री संघटन रविंद्र ओलालवार, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिप चे कृषी सभापती रमेश बारसागडे, समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडाप, गडचिरोली च्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, वडसाच्या नगराध्यक्ष शालूताई दंडवते, राष्ट्रीय परिषद सदस्य सत्यनारायण जी मंचालवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, भाजपचे ज्येष्ठ नेते नगरसेवक रमेशजी भुरसे,अनुसूचित जमाती मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, प्रदेश सदस्य संदीप कोरेत, ज्येष्ठ नेते दामोधरजी अरगेला, ज्येष्ठ नेते सुधाकरराव यनगंधलवार, विनोद आकनपल्लीवार, वडसा नप चे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, चामोर्शी चे तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, गडचिरोली चे तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, मूलचेराचे तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.