नागभीड येथे स्व.ओंकार निनावे यांचा स्मृतिदिन

15

🔹माजी आमदार प्रा.अतुल देशकर व जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे याची प्रमुख उपस्थिती

✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागभीड(दि.5सप्टेंबर):-भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे नागभीड तालुक्यात खोलवर रुजवणारे, सर्वसामान्य जनतेच्या मनात आपली जागा निर्माण करणारे,उमदे नेतृत्व,उत्तम वक्ता,उत्तम संघटक,अभ्यासू लोकनेते स्व.ओंकारजी निनावे यांचा अतिंशय कमी वयात झालेला मृत्यु हा पक्षासह त्यांच्या कुटुंबियांनाही वेदना देणारा होता तरीही त्यांचा स्मृतीदिन दरवर्षी सामाजिक उपक्रमातुन साजरा होतो हीच त्यांच्या कामाची पावती असल्याचे प्रतिपादन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार प्रा .अतुलभाऊ देशकर यांनी केले.

लोकनेते स्व. ओंकारजी निनावे यांना १७ व्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून स्व. ओंकार भाऊंचा आणि भाजपा चा अत्यंत जुना आणि निष्ठावान कार्यकर्ता श्री मनोहर ढोक यांना तुषार ओंकार निनावे कडून माजी आमदार श्री अतुल भाऊ देशकर यांच्या हस्ते भेट म्हणून सायकल देण्यात आली.

यावेळी भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजयजी गजपूरे, कृऊबास नागभीडचे उपसभापती रमेश पाटील बोरकर व संचालक आनंद कोरे, माजी सरपंच जहांगीर कुरेशी, नोटरी ॲड. रविन्द्र चौधरी, माजी ग्रा.पं.सदस्य मनोज कोहाट व सचिन चिलबुले , माजी पं.स.सभापती श्रीमती गीताताई पालपणकर , ब्रम्हपुरी पं.स.चे माजी उपसभापती नामदेव लांजेवार आणि श्रीमती निताताई ओंकार निनावे यांची उपस्थिती होती.