✒️नवनाथ आडे-(गेवराई,विशेष प्रतिनिधीमो:-9075913114

गेवराई(दि.6सप्टेंबर):-कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. यामध्ये एसटी महामंडळाच्या बसेस पूर्णत: बंद होत्या.बसेस बंद असल्याने महामंडळाचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान झाले. २० ऑगस्ट पासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात बदल करत एसटी महामंडळाच्या बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. २० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या दरम्यान बीड जिल्ह्यात महामंडळाला १ कोटी २० लाख रूपयाचे उत्पन्न मिळाले.

महामंडळाच्या दररोज ४५० फेर्‍या होत आहेत.मार्च एसटीच्या रोज होतात ४५० फेर्‍या, चौदा दिवसात १ कोटी २० लाखाचे उत्पन्न देशामध्ये कोरोना संसर्गाची लागण झाली.
जवळपास सहा महिने देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाच्या बसेस पूर्णत: बंद होत्या. बसेस बंद असल्याने महामंडळाला कोट्यावधी रूपयाचा तोटा सहन करावा लागला. गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊनच्या प्रमाणात बदल केला जात आहे. एसटी महामंडळाच्या बसला जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली.

२० ऑगस्टपासून महामंडळाच्या बसेस पुन्हा पूर्वीसारख्या धावू लागल्या. २० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या चौदा दिवसाच्या कार्यकाळात जिल्ह्यात एसटी महामंडळाला १ कोटी २० लाख रूपयाचे उत्पन्न मिळाले. आगारा अंतर्गत हे उत्पन्न आठ आगाराअंतर्गत आहे. दररोज ४५० फेर्‍या होत आहेत. १७० बस जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात धावत असल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जग्नोर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED