
✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114
गेवराई(दि.6सप्टेंबर):-बसस्टॅन्डसमोरील बंजारा हॉटेलजवळ आरटीओ एजंट असलेल्या श्रीमंत (सिरपा) बन्सीधर सरवदे वय अंदाजे 50 असून यांचा मृत्यदेह दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारीच्या दरम्यान अर्धनग्न अवस्थेत आढळून आला आहे. मयताची ओळख पटली. तो पंचशिल येथे राहणारा आहे.
घातपात असल्याचे नातेवाईकांकडून आरोप करण्यात येत असून घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.