शिक्षक दिन ऑनलाईन पद्धतीने उत्साहात साजरा

    65

    ✒️सांगली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    सांगली(दि.5सप्टेंबर):-एकता शिक्षण संस्था कुपवाड संचलित, एस. पी. कोचिंग क्लासेस, कुपवाड येथे सालाबादप्रमाणे शिक्षक दिन ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी शिक्षक प्रतिनिधींनी सहभाग घेवून उत्साहात साजरा केला. विद्यार्थी शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने विविध विषयांच्या तासिका घेवून शिक्षक दिनामध्ये सहभाग घेतला. तसेच संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या तासिकांमध्ये सहभाग घेतला.

    कु. अस्मिता सलगर , कु. धनश्री पवार , कु. तनुजा माने , कु. अदिती ठोंबरे , कु. वैष्णवी यमगर , कु. पंकज बसन्नावर , कु. आदित्य नागावे, कु. भूषण चौगुले या विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून काम केले. पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. या नाविन्य पूर्ण उपक्रमास संस्थेच्या संचालिका कु. प्रियांका सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.