✒️कुशल रोहिरात(सातारा, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.6सप्टेंबर):- कोरोना महामारीमुळे संपुर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह आपल्या सातारा जिल्ह्यात गेल्या काहीदिवसांपासून कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत.

या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचारमिळावेत या उदात्त हेतुने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबीयांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने८० बेडचे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये ४० बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज असून उर्वरीत ४० बेड विना ऑक्सिजनयुक्त आहेत दरम्यान, हे कोव्हीड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी विनामोबदला जिल्हा प्रशासनाकडे चालवण्यासाठी देण्यात येणार असून येत्या बुधवारी हे सेंटर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली या सेंटरमध्ये बाधीतांवर उपचार सुरु होणार आहेत, अशी माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.सोशल मिडीयावर रविवारी उदघाटन होणार असल्याच्या पोस्ट पडल्या आहेत, मात्र त्या पो घास्ट अधिकृत नाहीत, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. दरम्यान,आमच्या कुटुंबामार्फत शासनाची अथवा इतर कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वखर्चाने फक्त रुग्णसेवेसाठी हे सेंटर प्रशासनाला देण्यात येत असून याद्वारे कोरोना रुग्णांना नक्कीच दिलासा मिळेल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

विनाकारण बेड अडवू नका…जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.जिल्हा रुग्णालयासह इतर सर्वच हॉस्पिटल्समध्ये बेड शिल्लक नाहीत. केवळ रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि कोणतेही लक्षण दिसत नसताना फक्त भीतीपोटी काही रुग्णांकडून बेडवर कब्जा करण्याचे प्रकार होत आहेत. हॉस्पिटलमधील बेडची खरी गरज चिंताजनक प्रकृती असलेल्या तसेच वृध्द रुग्णांना आहे. कोणतेही लक्षण नाही किंवा फारसा त्रास होत नाही अशा रुग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशनचा पर्याय दिला आहे.अशा रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये उपचार घ्यावेत जेणेकरुन गरजू रुग्णांना बेड मिळेल आणि त्यांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचतील, त्यामुळे विनाकारण कोणीह बेड अडवू नका. तसेच कोरोनाला आळा घालण्यासाठी विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नका, सर्वांनी काळजी घ्या असे आवाहन आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमीत्ताने केले आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED