✒️ चांदू आंबटवाड(नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.6सप्टेंबर):- पंचायत समिती कार्यालय मुखेड येथे दिव्यांगाचा 5%नीधी 2016 पासुन वाटप न झाल्याने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्ष्यांचे प्रहार तालुका आध्यक्ष शंकर भाऊ वड्डेवार शहर प्रमुख साई भाऊ बोईनवाड युवा आध्यक्ष राहुल कदमवार पत्रकार पंकज भाऊ गायकवाड प्रहार संघटना मुखेड तालुका महिला अध्यक्ष राजेश्री गवलवाड राजमुद्रा ग्रुपचे सं आध्यक्ष सचिन पाटील इंगोले युवा उप प्रमुख बळीराम गेडेवाड अशोक भाऊ अनिकेत भाऊ शुभम भाऊ ठाकरे प्रहार संघटनेचे यादव गायकवाड चंदरबाई देवमारे सरोजना धारासुरे पार्वती वाघमारे प्रहार जनशक्ती पक्ष्यांचे व प्रहार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. व मा श्री बी डी ओ साहेबांनी निवेदनाची दखल घेत 8 दिवसांच्या आत सर्व ग्रामपंचायतीचा 5% निधी वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे प्रहार दिव्यांग संघटना मुखेड तालुका अध्यक्ष राजेश्री गवलवाड मैडम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED