स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ भिका दगडू राशिनकर स्मृती माझे बाबा भव्य ऑनलाईन राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

24

🔹साहित्य क्षेत्रातून लाभला उदंड प्रतिसाद

🔸रत्नागिरीच्या शारदा चिंतामणी व मुंबईच्या कल्पना म्हापुसकर यांची रचना ठरली सर्वोत्कृष्ट

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.6सप्टेंबर):-साहित्य क्षेत्रातील नावाजलेल्या मराठी साहित्य मंच समूह-१ ,समूह-२ व साहित्य तारांगण समूहाच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहित्य मंच चे सर्वेसर्वा, मार्गदर्शक व समूह संचालक राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर (साहेब) व महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख तथा दशभुज फाउंडेशन महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब राशिनकर यांचे पिताश्री स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ भिका दगडू राशिनकर यांच्या ११ व्या पुण्यस्मरण निमित्ताने मराठी साहित्य क्षेत्रात “माझे बाबा” या विषयावर भव्य ऑनलाईन राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कॅलीफोर्निया पासुन महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक,मध्यप्रदेश या राज्यातील तब्बल ४४० नामवंत व नवोदीत कवी-कवयित्री यांच्याकडून सदर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या भव्य ऑनलाईन राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत रत्नागिरीच्या शारदा चिंतामणी व मुंबईच्या कल्पना म्हापुसकर यांची रचना सर्वोत्कृष्ट क्रमांकाची तर बीडच्या मीरा सानप व बुलढाण्याचे संदीप मांन्टे उर्फ कवी मंगेश यांची रचना उत्कृष्ट क्रमांकाची मानकरी ठरली. साताऱ्याच्या स्वप्नील शिवाजी दानवरे,सिंधुदुर्गच्या ईश्वर हणमंत थडके,परभणीच्या डॉ.लक्ष्मण नाईक पाथरीकर,
बीडच्या दत्ता वालेकर,यवतमाळच्या प्रितम देवतळे यांच्या काव्यरचना विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत.तर प्रथम क्रमांकाने वर्धाच्या संगीता नरेंद्र गुळघाने पुण्याच्या स्मिता डी,,अहमदनगरचे भा.रा.कडू,पुण्याच्या
प्रा.सौ.संध्या बाळकृष्ण खैरनार,वर्धाचे दिलीप थुल यांना सन्मानित करण्यात आले आहे.

उच्चांकी स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत वाशीमचे रामहरी पंडीत,मुंबईचे चंद्रकांत खोसे,धुळ्याचे स्वप्नील अमृतकर,आष्टीचे किसन आटोळे सर,अहमदनगरचे बालकवी आविष्कार बळीद,यांना द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले तसेच पुणे चिंचवड येथील रा.ग.आडकर,मुंबई येथील सुनिल रामचंद्र पवार,यवतमाळ येथील,प्रमोद हामंद,पुणे येथील प्रा.शालिनी सहारे,धुळे येथील सौ.विजया भामरे या कवींच्या रचनांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे तर या स्पर्धेतऔरंगाबादच्या स्वप्नील प्रकाश धने,,अहमदनगरच्या आकाश मांडे,भाईंदरच्या सौ.सरोज सुरेश गाजरे,नाशिकच्या डॉ.एकनाथ गणेश कुलकर्णी,रायगडच्या नंदिता पाटील, यांच्या रचना उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र ठरल्या आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत डिजीटल सन्मानपत्र व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.साहित्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रमी स्पर्धकांचा सहभाग असणाऱ्या “माझे बाबा ” या काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिध्द ज्येष्ठ कवी व गीतकार राष्ट्रपालजी सावंत,प्रसिद्ध कवी द.भा. सडेकर,प्रसिध्द जेष्ठ साहित्यिक शब्बीरभाई शेख यांनी केले.समूह प्रशासक पत्रकार अंगदजी दराडे व नंदकुमार शेंदरे सर यांनी स्पर्धा संयोजनात महत्वपुर्ण भूमिका बजावली.

आयोजकांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणा निमित्त अश्या आगळ्या वेगळ्या भव्य दिव्य ऑनलाईन काव्यस्पर्धेचे संयोजन करून आपल्या वडिलांना एक अनोखी आदरांजली वाहुन एक नवा पायंडा तर पाडलाच शिवाय इतर शेकडो कवी कवायित्रीनांही आपल्या वडीलांविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी व्यासपिठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या शब्दरूपी भावभावनांचा गौरव केल्याची भावना त्यावेळी मान्यवर परिक्षकासह सहभागी सर्वांनीच व्यक्त केली.सदर काव्यरचनांचे इ-काव्य बुक ही लवकरच दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे.