डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचेकैवारी.
संत तुकाराम महाराज कुणब्यांचे.
अण्णाभाऊ साठे फक्तमातंगाचेच .
अहिल्यामाई होळकर धनगरांचीच.

ही आणि अशाप्रकारची भावना जनमानसाच्या मनात कुणी रुजविली..???

इथल्या ब्राम्हण्यवाद्यांनी जाणिवपूर्वक सर्व प्रकरची प्रसार माध्यमे, सांस्कृतिक साधणे आणि साहित्याचा बेमालूमपणे वापर करून वरील प्रकारची भावना भारतीय समाजाच्या मना मनात पेरली आणि आपला विभाजनवादी अजेंडा राबविला हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही…!!
त्याचाच परिणाम म्हणून भारतीय समाज जातियवादी आणि धर्मांध बनला…!!
काहींना अर्थात मोठ्या जातींना या षंढयंत्रा पासून राजकीय फायदा मिळू लागला म्हणून ते या विभाजनकारी षढयंत्राचे वाटेकरी झाले आणि ब्राम्हण्यवाद्यांचे हस्तक बनले…!!
ब्राम्हण्यवादी इतिहासात वरचढ का ठरत आले आहेत त्यापाठिमागे हाच विभाजनकारी अजेंडा आहे…!!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने सिम्बॉल अॉफ नॉलेज या ऊपाधीने गौरविले आणि ते जगविख्यात महापुरुष होते यावर शिक्कामोर्तब केले मात्र तरीही भारतीय माणसाला ते दलितांचे कैवारी आहेत असेच वाटते ही देणं ब्राम्हण्याची आहे…!!

कुणाच्या मस्तकावर कोणता शिक्का मारायचा आणि त्या राजकीय पुढाऱ्याला किंवा सामाजिक नेतृत्वाला एका कोंडवाड्यात कसे बंद करायचे याचे आराखडे इथले मनुवादी दर पिढिसाठी तयार करीत असतात आणि बेमालूमपणे राबवितं सुद्धा असतात….!!

प्रकाश आंबेडकर यांच्या मस्तकावर बौद्ध समाजाचा नेता असा शिक्का मारुन त्यांना एका कोंडवाड्यात बंदिस्त करायचा प्रयत्न इथले मनुवादी गेली ४०वर्षे करीत आहेत.आणि प्रकाश आंबेडकर त्यांच्या षंढयंत्रात बसत नाहीत,ते जातीच्या पलिकडे जाऊन,वर्ग लढे आणि समुह लढे लढतात म्हणून ब्राम्हण्यवादी हवालदिल झाले आहेत…!!

३१अॉगस्ट २०२० ला पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासाठी प्रतिकात्मक आंदोलन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले त्यावरुन अनेकांच्या अर्थातच ब्राम्हण्यवाद्यांच्या पोटात पोटशूळ ऊठला आणि म्हणूनच मग त्यांनी आपल्या हस्तकांना कामाला लावले आणि टिकेचा सुर वाढविला आहे…!!

वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे कुण्या समाजाचे,गटाचे वा वर्गाचे हे ठरविताना ब्राम्हण्याला फार कठीण झालं म्हणून मग ते हवालदिल आहेत…!!

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे आंदोलन ही काही पहिली वेळ नाही. गेल्या ४०वर्षापासुन बाळासाहेब आंबेडकर हे एक भारतीय नेते म्हणून आपलं कार्य अविरतपणे करीत आहेत…!!
१९८० ते २०२० हा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जीवनाचा ४० वर्षाचा कालखंड आहे…!!
त्यामध्ये
१) १९८२ साली बाळासाहेब आंबेडकर यांनी गायरान जमीनीचा लढा ऊभा केला…त्यासाठी भुमिहीन हक्क संरक्षण समीती स्थापणं केली,भुमिहीनांना जमीन मिळवून दिली…हा वर्ग लढा होता, जातीच्या पलिकडचा…!!
२)१९८३ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी इशारा मोर्चा काढला आणि शेतकरी बांधवांसाठी लढा ऊभा केला…!!
३) १८८५ साली पुणे ते माणगांव असा शेतकऱयांसाठी “लॉंगमार्च” काढला हाही वर्ग लढा होता..!!
४) शेतकरी परिषदांचे आयोजन…!
२९फूब्रूवारी १९९९ मलकापूर जि.बुलढाणा येथे.
२० सप्टेंबर २००६ शेगाव जि.बुलढाणा येथे…!!
५) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरोधात नागपूर हायकोर्टाच्या न्यायमूर्ती दिलिप सिन्हा आणि न्यायमूर्ती मोरे यांच्या बेंचवर याचिका क्र.४७००/२००६ दाखल केली आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वत: युक्तीवाद केला…!!
६) शेतमालाच्या भावासाठी,ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढे ऊभे केले…!!
७) स्त्री मुक्ती परिषदांचे आयोजन…!!
१९९७.. नागपूर..१९९८..पुणे..१९९९..औरंगाबाद,२०००अहमदनगर.
२००१,ठाणे..२००२ अकोला.
२००३ गोंदिया..२००४ मुंबई.
२००५ महाड. २००६ नांदेड..!
आणि २००७ पासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयी हाही वर्ग लढा आहे…!!
८) २००८ साली भारिप बहुजन महासंघाच्या वतीने महाराष्ट्रात ओबीसी हक्क परिषदांचे आयोजन केले होते…!!
९) धोबी समाजासाठी लढा…!!
धोबी समाजाला एस.सी.प्रवर्गात समाविष्ट करुन घ्यावे म्हणून १७ हे २००१ ला पुण्याच्या आयुक्तालयावर बाळासाहेब आंबेडकरांनी विशाल मोर्चा काढला आणि धोबी समाजांचे आंदोलन लढले…!
१०) ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना…!!
नांदेड येथील अधिवेशनात २९आॅक्टोबर १९९८ ला ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ठराव पास केला आणि शिष्यवृत्ती मिळवून दिली…!!
११) स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी,”विदर्भ राज्य जागृती अभियान” १९ नोव्हेंबर ते २८नोव्हेबंर २००० सिंदखेडराजा ते भंडारा गोंदिया रथयात्रा काढली होती…!!
१२) मुस्लिम समाज बांधवांसाठी…!!
पोटा विरोधी परिषदांचे आयोजन.
यवतमाळ आणि परभणी येथे केले.
तसेच सच्चर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात म्हणून महाराष्ट्रात आंदोलन उभे केले…!!
१३) आदिवासी परिषदांचे आयोजन…!!
३फेब्रूवारी २००४ टुणकी जिल्हा बुलढाणा.
२४/२/२००१ मंगरुळपीर जि.वाशिम येथे गोपाळ समाजाचे अधिवेशन…!!
१४) ओबीसी बांधवांच्या कर्जमाफीसाठी….!!
२४/३/२००८ मुंबई विधीमंडळावर भव्य मोर्चा महामंडळा कडुन घेतलेले कर्ज माफ करावे,लढा यशस्वी केला…!!
१५) वारक-यांसाठी मोर्चा…!!
२००९साली भामरागड डोंगरावर डाऊ ही केमिकल कंपनी सुरू होणार होती त्या कंपणी विरोधात नागपुरच्या विधिमंडळावर विशाल मोर्चा काढला आणि तुकाराम महाराजांची समाधी वाचविली…!!
१६) हायकोर्टावर मोर्चा…!!
१सप्टेंबर २००५ ला मुंबई येथील हायकोर्टावर मोर्चा काढून विद्यार्थ्यांच्या आरक्षणावर येणारी गदा टाळावी म्हणून ऐतिहासिक मोर्चा काढला…!!

जातीच्या आणि धर्माच्या पलिकडे जाऊन वर्ग लढे तथा समुह लढे लढून अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिले आहे की मी भारतीय नेता आहे…!!
शरद पवार हे मराठ्यांचे नेते आहेत यावर ब्राम्हण्यवाद्यांनी शिक्कामोर्तब केले आहे आणि शरद पवारांनी ते स्विकारले सुद्धा आहे कारण त्यांना त्या प्रतिमेतून सत्तेची प्राप्ती होते आहे…!!
म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणतात इथे काही जातींचे काही धर्माचे नेते आहेत, भारतीय नेतृत्वाची वानवा आहे…!!
समस्त भारतीय नागरिकांनो , संविधानवादी मित्रांनो आणि समतेच्या मार्गावरील सैनिकांनो, ओबीसी बांधवांनो भगिनींनो, अल्पसंख्याक समुहातील सुज्ञ जनांनो आता तरी सर्वांनी समजून घ्यावे…!!
बामणी कावा परास्त करायचा असेल आणि इथं समतेचं शासन आणि प्रशासन हवं असेल तर आपला नेता हा बहूआयामी आणि भारतीय असावा हीच अट घातली पाहिजे आणि पुढिल वाटचाल केली पाहिजे…!!
प्रकाश आंबेडकर कुणाचे..??
तर आम्हा समस्त भारतीयांचे ही भावना आता, दलित, आदिवासी, भटके विमुक्त,स्त्रीया, विद्यार्थी, शेतकरी कष्टकरी भुमिहीन यांच्या मनात रुजली पाहिजे ही काळाची हाक लक्षात घ्या…!!
जयभीम.

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने
( राजकीय विश्लेषक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार,विचारवंत,जेष्ठ मार्गदर्शक, अकोला जिल्हा)
           मो:-99602 41375

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED