शिक्षक दिनी डी.एड. पदवीधर शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण

60

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.6सप्टेंबर):-महाराष्ट्रात खाजगी माध्यमिक शिक्षकांचे व्यवस्थापन आधिनियम १९७७ व नियमावली १९८१ प्रमाणे चालते. माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता नियम १२ अनुसुची फ परिच्छेद २ प्रवर्ग क मधील ४ मुद्दे व टिप १ ते१० प्रमाणे ठरवावी असे दिले आहे, त्यानुसारच डी. एड. शिक्षक पदवीप्राप्त दिनांकापासून प्रवर्ग क मध्ये जातो.

तशा प्रकारचे पत्र राज्याचे राज्य शिक्षणमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या निर्देशानुसार व अवर सचिव यांच्या परिपत्रक दि. ३/५/२०१९ व पत्र दि १९/१०/२०१९ च्या अनुषंगाने अमरावती विभागाचे उपसंचालक ए एस पेदोंर साहेबानी त्यांच्या पाच जिल्हयासाठी काढले आहे. तसेच स्पष्ट परिपत्रक मा. अवर सचिव, मा. संचालक यांनी काढून संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी व डी. एड. पदवीधर शिक्षकांना न्याय दयावा. टिप २, ५ व ८ चा वापर करून सामाईक सेवाजेष्ठता करावी. महाराष्ट्रातील शिक्षणाधिकाऱ्यांमध्ये सेवाजेष्ठता व पदोन्नती बाबत एकवाक्यता असावी. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघाच्या शिक्षकांनी शिक्षकांच्या सन्मानाच्या दिवशीच संपूर्ण महाराष्ट्रात घरात राहून लाक्षणिक उपोषण केले. प्राप्त माहिती शिक्षक व महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष, रयत सेवक मित्र मंडळ सातारा चे सचिव तसेच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार नंदकिशोर गायकवाड यांनी दिली.

या उपोषणात समस्त महाराष्ट्रातील हजारो शिक्षक सहभागी झालेत. संस्थापक अध्यक्ष पद्मा तायडे, कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड, महासचिव बाळा आगलावे, विभागीय सचिव डॉ. काशिनाथ सोलनकर, रयत सेवक मित्र मंडळाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दादासाहेब गाडे रयत मित्र मंडळाचे कोषाध्यक्ष भिमा लेंभे,सहसचिव बालाजी बोंबडे, संघटक दिपक भोये, जनार्धन खेताडे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दिलीप तुपे,एस के शिंदे, शाम भोये, नवनाथ चिभडे,दत्ता कसबे, शिवदास सातपुते, उत्तमराव नलावडे, संजय जोशी सर्व विभागीय सचिव व सर्व पदाधिकारी यांनी व सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व विविध जिल्ह्यांतील शेकडो शिक्षकांनी सहभाग नोंदवला.