महाराष्ट्र कुपोषण मुक्त करूया – प्रमोद डोंगरे

    46

    ✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी):-9075913114

    बीड(दि.6सप्टेंबर):- जिल्ह्यातील सर्व जनतेनी अंगणवाडी धान्य वाटप मधील नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी सतर्क राहून संबंधित विभागाने अनेक ठिकाणी दोन किलो गहू, एक किलो मुगडाळ, एक किलो चवळी, एक किलो मटकी, एक किलो मसूर डाळ, अर्धा किलो तेल, पावशेर तिखट,पावशेर हळद, अर्धा किलो मीठ या सर्व साहित्यात बीड जिल्ह्यातील अनेक गावातून तक्रारी येत आहेत.

    या सर्व साहित्यात फसवणूक करीत असताना काही पाकिटात चक्क हरभरा देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे यातील वाढत्या भावाचे पैसे कोण खते, भ्रष्टाचार कोण करत आहे याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी आपण संबंधित विभागाकडे अड रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा प्रमुख सुनील ठोसर पाटील रयत यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेच्या वतीने करणार आहोत आम्ही आमच्या अनेक सर्कल प्रमुख, मित्र परिवार, तालुका प्रमुख यांच्या वतीने अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अनेक ठिकाणी नेत्याच्या आशीर्वादाने पगार उचलण्याचे काम सुरू आहे.

    परत गोरगरिबांच्या धान्याचा काळा बाजार होताना दिसत आहे हे पाप कुठे फेडणार असा प्रश्न गोरगरीब मायबाप जनता आमच्या परिवाराचे सदस्य यांचे मार्फत मागणी करण्यात येत असून येत्या आठ दिवसांत बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व साहित्य पूर्ण वाटप न केल्यास अंगणवाडी कुलूप ठोकून समोर जागरण गोंधळ सुरू करू अनेक ठिकाणी गावातील अश्या अंगणवाडी सेविका बडतर्फ करण्याची मागणी आम्ही लवकरच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांचे कडे तक्रार करणार असून असा इशारा रयत शेतकरी संघटनेचे नेते बीड जिल्हा सचिव प्रमोद भाऊ डोंगरे यांनी दिला आहे यावेळी माऊली नवले, राजू मोरे, राम नवले, अर्जुन चाटे, अनिल काकडे, आदित्य ठोसर, भगवान कदम, शिवदास सोळुंके, नईम अत्तर, अक्षय माने, अमोल भोकरे, नवनाथ आडे, बाबुराव भोईटे आदी विविध पदाधिकारी उपस्थित होते बीड जिल्ह्यातील कुठल्याही बालकांचा हक्काचं राशन कुणी खात असेल तर चुकीला माफी मागायला वेळ सुद्धा ठेवणार नाही असा सर्वानुमते घेण्यात आला.