वडिलाच्या कर्जामुळे मुलाची विष पिवून आत्महत्या

16

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.6सप्टेंबर):-लॉकडाऊनमुळे पुण्याचे काम बंद झाले. गावात काही काम नाही. त्यातच वडिलाच्या डोक्यावर कर्ज असल्याने या नैराश्यातून एका २२ वर्षीय तरूणाने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना चव्हाणवाडी येथे घडली. या घटनेने कुक्कडगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हनुमान विक्रम सावंत (२२, रा.चव्हाणवाडी) हा तरूण पुणे येथे एका मेडिकलवर कामाला होता. कोरोनाच्या संकटामुळे काम बंद पडल्याने हा तरूण गावाकडे आला होता. गावाकडे काही काम नसल्याने तो नैराशेत राहत होता. त्यातच वडिलाच्या आजार आणि वडिलाच्या डोकयावर असलेल्या कर्जामुळे तो नेहमी चिंतेत राहत असे. याच चिंतेतुन त्याने काल सकाळी विषारी औषध प्राशन केल्याने त्याला उपचारार्थ रूगणालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सदरील तरूणाचा रात्री मृत्यू झाला. या घटनेने कुक्कडगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.