🔸प्रवीण चन्नावार यांची मागणी

✒️संतोष संगीडवर(आल्लापली)

मो:-7972265275

गडचिरोली(दि.6सप्टेंबर):- या जंगलव्याप्त जिल्ह्यात मोहफुलांचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असून त्यामानाने त्याला भाव मिळत नाही.त्यामुळे मोहफुलांचे खुली बाजारपेठ करून मोहफुलावर आधारीत दारूचा कारखाना उभारण्यात यावा मिळणाऱ्या उत्तपणातून जिल्ह्याच्या विकासात भर घालावी अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांनी केली.महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात1993 पासून दारूबंदी जाहीर केली.शासनाला हा निर्णय घेण्यास बाध्य करण्यासाठी सर्चचे प्रणेते डॉ. अभय बंग असंख्य कार्यकर्त्यांची मनस्वी तळमळ व अथक परिश्रम कारणीभूत ठरले. दारूच्या वाईट व्यसनामुळे अनेक कुटुंब उदवस्त होतात त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह आहे, पण ही दारूबंदी कागदोपत्री राहिली.जिल्ह्यात दारुबंदी असूनही ही दारूबंदी यशस्वी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे.त्यामुळे कागदोपत्री असलेल्या दारुबंदीमुळे मिळणाऱ्या महसूलपासून वंचीत राहावे लागत आहे.दारूमुक्त जाहीर झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात प्रत्यक्ष मात्र दारुयुक्त असणारा जिल्हा आहे.दारूबंदी झाली ती फक्त कागदोपत्री, पण प्रत्यक्षात गडचिरोली पासून जिल्ह्यातील खेड्यापाड्यात सर्वत्र दारू मिळते. एकंदरीत यामुळे शासनाला मिळणार महसूल बुडत आहे.

त्यामुळे जिल्ह्यात दारू दुकाने पूर्ववत सुरू करा , जेणेकरून शासनास महसूल मिडेल व त्या महसुलामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लागेल. जिल्ह्यातील दारूबंदी उठवून गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलाचा कारखाना सुरू केल्यास तो फायदेशीर ठरेल. मोहफुलची खुली बाजारपेठ व कारखाना उभारल्यास या उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यात रोजगार प्राप्त होईल, वनसंपदेचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना होईल जिल्ह्यात दारूबंदी असुनही देशी, विदेशी, व गावठी मोहफुलांचे दारूविक्री सरासपणे सुरू आहे. दारुतून मिळणारा जिल्ह्यातील पैसे वापरून पश्चिम महाराष्टातिल द्राक्ष उत्पादक गलेलठ्ठ बनले आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक देणं असलेल्या वनसंपदेमध्ये मोहफुलांचा फार मोठा वाटा आहे.येथील मोहफुल अत्यन्त पौष्टिक स्वरूपाचे आहे.

जिल्ह्यात उद्योगाचे कोणत्याही प्रकारची साधने नसल्याने येथील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे येथील जनतेला त्यापासून वंचीत राहावे लागत आहे.त्यामुळे येथील जनतेला व बरोजगारांना न्याय देण्यासाठी दारूविक्री सुरू करून बुडणारा महसुल वाचवून जिल्ह्याच्या विकासासाठी तो खर्च करण्यात यावा.बेरोजगारी दुर करण्यासाठी जिल्ह्यात मोहफुलाची बाजारपेठ उपलब्ध करून दारूचा कारखाना प्रशासनाने उभारून जिल्ह्यच्या विकासासाठी हातभार लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांनी केली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED