महिलांच्या सक्षमीकरणासाठी आजी माजी सरकार अपयशी- शाहीन पठाण

35

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.6सप्टेंबर):-महिलांना सक्षम करणे, बचत गटाच्या महिला फक्त राजकीय पक्षांनी सभा, हे कर्ज देऊ, बिनव्याजी कर्ज योजना, महिलांच्या समस्या सोडू, महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देण्यात येईल, बँक कर्ज उपलब्ध एकच नाण्याच्या दोन बाजु असून आजपर्यंत महिलांच्या सक्षमीकरणासाठी कुठल्याही विषयावर कोणत्याही सरकारने काहीही दिवे लावले नाही फक्त राजकीय नेते, महिला नेत्या पोकळ घोषणाच उरल्या असून मोदी साहेब औरंगाबाद येथील सभेत सांगितलेले आश्वासन विसरले का? असा प्रश्न भूलथापा देऊन सभेला गर्दी करून ग्रामीण विकास होईल का? महिला बालकल्याण सर्व विभाग झोपलाय का? सभापती साहेब या विभागाची जबाबदारी पार पाडायची तुमची ताकत नाही तर सभापती पदावरून पायउतार झाले पाहिजे? यांना महिलांच्या समस्या फक्त कुठल्याही निवडणुका तोंडावर आल्या तर सगळ्यांना समस्या आठवतात बाकी नंतर सर्व नेत्यांचे तांगे पलटी घोडे फरार अशेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

खिचडी शिजवणे, अंगणवाडीतील सर्व राजकीय बगल बच्चे गरिबांच्या लेकराला उपाशी पोटी ठेऊन माल विकण्यासाठी शासनाने योजना सुरू केल्या आहेत का? गोरगरीब महिलांना पात्र लाभार्थी याठिकाणी न घेतल्यास याद राखा गाठ आमच्याशी आहे हे विसरू नका? यात सहभागी बीड जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी असणाऱ्या सर्व विभागातील प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी आपण यापुढील काळात सर्व योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना झिरो टक्के व्याज, शिलाई मशीन, छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज अश्या अनेक योजनेचा वापर राजकीय पक्ष आपल्या पिळवली सोडता सामान्य ग्रामीण भागात एकही खडकु दिला हे कुठल्याही सदस्यांनी सांगावे.

उलट बीड जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी असणाऱ्या सर्व योजना मराठवाडा विभागाच्या महिला प्रमुख नयना गवळी रयत शेतकरी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्य असणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उग्र असे बेलने घेऊन सरकारला जोडे मारायला मागेपुढे पाहणार नाही असे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतमाता लोक संचलित साधन केंद्र प्रमुख शाहीन पठाण सामाजिक कार्यकर्ता व संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आमचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले सरकार व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून याकडे संपूर्ण बीड जिल्ह्यातील महिला व महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव, सदस्य यांचे लक्ष लागले आहे.