पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांची दैनिक मराठवाडा केसरीच्या पुणे ग्रामीण प्रतिनिधी पदी नियुक्ती

    42

    ✒️पुणे(पुरोगामी संदेशनेटवर्क)

    पुणे(दि.6सप्टेंबर):-पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांची दैनिक मराठवाडा केसरीच्या पुणे ग्रामीण प्रतिनिधी पदी नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी आजवर केलेल्या उत्कृष्ट सकारात्मक कार्याची दखल घेऊन त्यांची दैनिक मराठवाडा केसरीच्या पुणे ग्रामीण प्रतिनिधी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल पुणे जिल्हा ग्रामीण विभागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी, तसेच सर्व स्तरातील लोकांनी पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

    तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचाल करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सैदव पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी अथक प्रयत्न करून समाज सेवा करणारे सुनिल ज्ञानदेव भोसले यांना सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा, असे महत्त्वपूर्ण स्वरूप असलेला *आदर्श पत्रकारिता पुरस्कार २०२०* देऊन गौरविण्यात आले आहे. सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी सदैव पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून आदर्श निस्वार्थी भावनेतून समाजाची सेवा केली आहे. तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांनी राज्यभरातील विविध भागात कायम कार्यरत राहून वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तीचीं दखल घेऊन त्यांच्या कार्याला लोकप्रिय वृत्तपत्रात प्रसिद्धी दिली आहे . पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी समाजातील सर्व स्तरातील सामान्यवाचकां पासुन ते सुशक्षितवाचकां पर्यंत साऱ्यांनाच वृत्तपत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे .

    सुनिल ज्ञानदेव भोसले पत्रकारितेच्या माध्यमातून अहोरात्र जनतेसाठी जनजागृतीचे अभिमानास्पद महान कार्य करीत आहेत. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक सामाजिक संस्था , विविध संघटनांच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दैनिक मराठवाडा केसरीच्या पुणे ग्रामीण प्रतिनिधी पदी निवड झाल्या बद्दल पत्रकार सुनिल ज्ञानदे भोसले यांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात सर्वत्र हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले जात आहे.