ध्येय उद्योग समूह अहमदनगर तर्फे शिक्षक राजेंद्र बन्सोड सन्मानित

    63

    ✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    गोंदिया(दि, 6 सप्टेंबर ):-ध्येय उद्योग समूह अंतर्गत दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील आणि कर्तृत्वान शिक्षकांचा गुणगौरव करण्यात येतो.यावर्षी ध्येय उद्योग समूह अहमदनगरतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2020
    राजेंद्र धर्मदास बन्सोड यांना देण्यात आला.

    राजेंद्र धर्मदास बन्सोड हे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा,पंचायत समिती गोरेगाव ,जिल्हा परिषद गोंदिया येथे कार्यरत असुन उपक्रमशिल शिक्षक म्हणून ओळख आहे. यावर्षी कोरोना संक्रमानामुळे ऑनलाईन पुरस्काराचे वितरण करण्यात आले.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे मित्रपरिवार आणि स्वकीयांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहेत.