जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा येथे शिक्षक दिन

34

✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गोंदिया(दि.7सप्टेंबर):-कोरोना संक्रमण काळामुळे शाळा बंद आहेत परंतु शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण तथा विविध प्रकारच्या कार्यक्रमत सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतर्फे विविध नवोपक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी मोठया उत्साहात शाळेत शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.दरवार्षिसारखे यावर्षी मुलांना छान वेशभूषा करून स्वयंशासन दिन साजरा करीत शिकविण्याची संधी मिळायची. आज ती त्यांना घरी राहून करता येण्यासाठी शाळेने घरी राहून विद्यार्थ्यांना शिकविताना विडिओ पाठविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले याला .पालकांचा प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांचा सहभाग प्रशंसनीय आहे.शिक्षकदिनाचे औचित्य साधून मुलांनी निबंध ,भाषणे आणि शिक्षकांसाठी शुभेच्छा कार्ड्स बनविले.अंगणात रांगोळी काढुन आपल्या शिक्षकांप्रती असणारा प्रेमभाव व्यक्त करीत हार्दिक शुभेच्छा देणारे संदेश त्यात लिहिले.

पालकांच्या मदतीने विडिओ ,फोटो आणि फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुलांमध्ये असणारी शिक्षकांप्रती गोडी आणि शाळेची आठवण तीव्रतेने जाणवते.याप्रसंगी शाळेने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे गावात व शाळा व्यवस्थापन समितीकडून कौतुक करण्यात येत आहे. मार्गदर्शक आर.एच. नंदेश्वर सर मुख्याध्यापक आणि शाळेचे उपक्रमशील शिक्षक राजेंद्र बन्सोड सर ,कोहरे सर यांनी मुलांना स्पर्धेत सहभागी करून त्यांना मार्गदर्शन केले .मुलांनी दिलेला प्रतिसाद उत्तम होता.उत्साहात घरी विविध प्रकारच्या कार्यक्रम सादर करून शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.