नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाना दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या प्रयत्नाने अनेक दानशुरानी दिव्यांग बांधवांना केली मदत

  39

  ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनीधी)मो:-७७५७०७३२६०

  नांदेड(दि.7सप्टेंबर):- जागतिक करोना संकटाकाळि दिव्यांग, वृध्द निराधार याना शासन प्रशासन लोकप्रतिनिधी दानशूर मंडळीनी मदत करावी म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी फोनवर विनंती केल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या प्ररिस्थीची जाण असलेल्या सतत समाजसेवा करणाऱ्या मा विमलताई साळवे यांनी नांदेड शहरातील दिव्यांग बांधवांना राषण किट देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
  अशा संकटकाळी दिव्यांग बांधवांना शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी मदत करावी म्हणून मा डाकोरे पाटिल यांनी अनेक निवेदन व घरोघरी अनेक प्रकारचे उपोषण केल्यामुळे
  शासनाने अनेक बारा शासन निर्णय योजना जाहीर केल्या पण ते आदेश कागदोपञीच आहेत.मा खासदार आणि आमदार लोकप्रतिनिधी निवडणूक काळात चुरस असलेले उमेदवार यांनी दिव्यांग बांधवांना मदत केली नाही.

  प्रशासकीय अधिकारी यानी सुध्दा शासन निर्णय यांची अंमलबजावणी केली नाही तर नेहमी मिळणारे तहसिल यांच्या कडुन मिळणारे अनुदान चार महिन्यापासून मिळत नसल्यामुळे दिव्यांग अर्ध उपाशी राहाण्याची वेळ आल्यामुळे डाकोरे यांनी केलेल्या विनंतीवरून नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दानशूर व्यक्तीनी मदत करावी असे आव्हान केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील समाजकल्याण अधिकारी यानी भाजीपाला किट देऊन माणुसकीचे दर्शन घडविले
  नांदेड महानगर पालिका सदस्य मा.राजु गोरे. रामदास पाटिल मार मंडळ यांनी मुखेड तालुक्यातील दिव्यांग बांधवांना धान्य किट देऊन आर्दश घडविला नायगाव तालुक्यातील तहसिलदार मँडम. नायगाव तालुक्यातील धान्य किट, देऊन आपली दिव्यांग बांधवांना मदत केली.

  आज 31 आँगस्ट रोजी .मा. विमलताई साळवे यांनी नांदेड शहरातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केलेल्या विनंतीवरून दिव्यांग बांधवांना धान्य किट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे असेच दानशूर व्यक्तीने खर्या ईश्वराची मदत करून आशीर्वाद घ्यावा असे आव्हान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुचेलीकर गजानन हंबर्डे,संगिता बामणे,सविता नांवदे,पंडीत वाघमारे यांनी केले.