श्रीदत्त दिव्यांग व निराधार सेवाभावी संस्था टाकवडे यांचा एक आगळा-वेगळा उपक्रम

29

✒️माधव शिंदे(नांदेड,विशेष प्रतिनिधी )मो:-7757073260

नांदेड(दि.7सप्टेंबर):-सध्या वाढत्या कोरोना covid-19 च्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणारे शहर वाहतूक पोलीस यांच्या आरोग्याची काळजी म्हणून व एक सामाजिक बांधिलकी म्हणून इचलकरंजी शहर वाहतूक शाखेला मास्क वाटप करून एक वेगळा उपक्रम सादर केला.

समाजातील वंचित घटक दिव्यांग लोकांच्या कडून त्यांच्या दिलेल्या पेन्शनच्या रकमेतून थोडीफार रक्कम काढून संस्थेच्या सर्व संचालकांनी शहर वाहतूक शाखा इचलकरंजी यांना मास्क चे वाटप केले व तसेच वाहतूक शाखेच्या मोरे साहेबांना एक निवेदन देण्यात आले कि नो पार्किंग मध्ये दिव्यांगांचे मोटर सायकल व कार गाडी असल्यास त्याला आपल्या वाहतूक शाखेच्या क्रेन ने टोल करू नये व त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू नये कारण दिव्यांग व्यक्तीला रस्ता पार करणे शक्य नाही. असे विनंतीचे निवेदन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे साहेब यांना देण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष सुरेश माळी खजिनदार अश्विनी पाटील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दिपक लोखंडे सरचिटणीस विश्वनाथ कबाडे अपंग संघटनेचे परशुराम सफारे साहेब व सदाशिव गदाळे इतर मान्यवर उपस्थित होते.