

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405
परळी(दि.7सप्टेंबर):-परळी मध्ये तहसीलदार यांना मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन परळी तर्फे निवेदन देण्यात आले.मुस्लिम समाज हे शिक्षणा पासून फार वंचित आहे. व शासनाच्या सेवेत नोकरी करिता मुसलमानांना 10% आरक्षण मिळावे ह्या करिता परळी मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन तर्फे तहसीलदारा मार्फत मां. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.
या निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की साध्या च्या परिस्थितीत मुस्लिम समाज हे फार वंचित असून व शिक्षणाचे प्रमाण कमी असून त्यांनी शिक्षण घेण्यासाठी व राज्य सेवेत नोकरी साठी 10% आरक्षण देण्यात यावे अशी मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन परळी तर्फे करण्यात आले आहे.