पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे मिळाले नाही ? येथे करा तक्रार!

8

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

📍 पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्याचा सरकारचा उद्देश आहे. मात्र पैसे खात्यात जमा झाले नाही तर कुठे तक्रार करावी हे माहीत नसते.

💁‍♂️ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 2000 रुपयांचे 3 हफ्ते पाठविले जातात. अशाप्रकारे 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यात पैसे आले नसल्यास खालील ठिकाणी तक्रार करा.

● हेल्पलाइन नंबर : 155261
● टोल फ्री नंबर : 1800115526 किंवा 011-23381092
● ई-मेल आईडी : pmkisan-ict@gov.in

💫 फेब्रुवारी 2019 पासून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत.