आलापल्ली येथील जळलेल्या त्या सागवान बीटाची सखोल चौकशी करावी

14

🔸 विलास पोचमपल्लीवार यांची मागणी

✒️संतोष संगीडवर(आलापल्ली प्रतिनिधी)

मो:-7972265275

आलापल्ली(दि.7सप्टेंबर):-वनपरिक्षेत्र कार्यालय आलापल्ली अंतर्गत खसरा डेपो आलापल्ली येथे दिनांक 21/04/2020 रोजी दुपारी 4 वाजता आग लागली. त्या आगीत सुमारे 500 बिट जळाऊ व सागवान बिट जळून खाक झाल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी आलापल्ली यांनी दिली. सदर खसरा डेपो ची एकूण क्षेत्रफळ व उपलब्द मनुष्यबळ लक्षात घेता सदर आग हि लागली किंवा लावल्या गेली हे शंकास्पद आहे. त्या आगीची संपूर्ण सखोल चौकशी करावी असे नवनियुक्त शिवसेना तालुका प्रमुख विलास पोचमपल्लीवार यांची मागणी आहे.

आलापल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत आलापल्ली खसरा डेपो हा एटापल्ली रोड वर आहे. यात सागवान बीटाची लिलाव प्रक्रिया होत असते. सदर बीटमध्ये नेहमी वनपाल, वनरक्षक, तसेच 6 ते 8 चौकीदार रात्र दिवस कार्यरत असतात. काही वर्षांपूर्वी सदर डेपोमध्ये आग लागून पूर्णतः खाक होऊन शासनाचा लाखो रुपयाचा नुकसान झालेला होता. पुन्हा तीच पुनरावृत्ती 21/04/2020 ला होऊन पुन्हा शासनाचा लाखो रुपये बुडाला. सदर आग हि लागतं कि लावल्या जातं हे शंकास्पद आहे असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सदर चौकशी पूर्ण होईपर्यंत सद्या कार्यरत जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे. चौकशी अंती योग्य ती कार्यवाही करुन नुकसान भरपाईची लाखो रुपयाची रक्कम जबाबदार अधिकाऱ्याचे वेतनातून कपात करण्यात यावी. सदर बाबीची यथायोग्य चौकशी न झाल्यास शिवसेना अहेरी तालुका वतीने आंदोलन करण्यात येईल असी चेतावणी अहेरी शिवसेना तालुकाप्रमुख विलास पोचमपल्लीवार यांनी दिली.