सकल मराठा विवाह संस्थेची राज्य कार्यकारिणी लवकरच जाहिर करणार – लक्ष्मण मडके

37

✒️शेवगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

शेवगाव(दि.7सप्टेंबर):- सकल मराठा विवाह संस्था मराठा समाजातील राज्यातील एकमेव सक्रिय विवाह संस्था म्हणून सर्वांना परिचित आहे मागील पाच वर्षात फक्त सोशल मीडियावर अवलंबून न राहता अगदी समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत विवाह संस्थेचे मजबूत जाळे तयार केले असून समाजातील अनुरूप व अपेक्षा नुसार स्थळे मिळवून देण्यासाठी सकल मराठा विवाह संस्थेकडे पाहिले जात असल्याने विवाह संस्थेची लवकरच राज्यस्तरीय कार्यकारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा विवाह संस्थेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मणराव मडके यांनी दिली.

लक्ष्मणराव मडके यांनी सांगितले की , आजच्या धकाधकीच्या जीवनात जगभरातील सकल मराठा वर- उपवर, वधू-उपवधु, व त्यांचे पालक आपल्या पाल्यासाठी योग्य स्थळाच्या शोधात बरीच दमछाक करताना दिसतात तसेच अपेक्षा नुसार अनुरुप स्थळे मिळणे फार अवघड असते.तसेच विवाह जुळवून देण्यासाठी समाज अनेक दलाल,एजंन्ट आणि फसवे वधु-वर सुचक केंद्र निर्माण झाल्याचे दिसुन येत असल्याने अशा परिस्थितीत आपल्या सकल मराठा समाजातील मुला- मुलींचे लग्न जमवताना येणाऱ्या अडचणींचा विचार करून मराठा क्रांती मोर्चा च्या माध्यमातून प्रेरणा घेऊन राज्यातील सनदी अधिकारी, निवृत्त राजपत्रित अधिकारी, निवृत्त शासकीय निमशासकीय कर्मचारी,यांच्यासह समाजाविषयी तळमळ जिव्हाळा व आत्यंतिक प्रेम असलेले डॉक्टर,वकील, इंजिनीयर व विविध संस्थेचे, संघटनेचे पदाधिकारी, मराठा समाजचे यशस्वी वधु-वर सुचक केंद्र व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन सकल मराठा विवाह संस्था या केंद्राची स्थापन करुन सकल मराठा डाॅट इन या संकेतस्थळाच्या माध्यमातून विवाह संस्था अनेक मात्र, वेबसाईट एक.. हा उपक्रम राबवून विविध वधु-वर सुचक केंद्रांच्या माध्यमातून एकाच संकेतस्थळावर मराठा समाजातील अनेक पोटजाती नुसार अनुरूप वधु-वर यांची माहिती उपलब्ध करुन दिली असुन विवाहसाठी जी काही खरेदी व सुविधा उपलब्ध करुन घ्यावी लागते त्या व्यवसायिकांचे मोबाईल नंबर व व्यवसायाची बाजारपेठेची माहिती ही यांच संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याचे हि काम सकल मराठा विवाह संस्था करणार असुन या पुढे समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन सकल मराठा समाजातील विवाहयोग्य वधु-वरांना अनुरुप स्थळे उपलब्ध करुन देऊन व विवाह जुळवितांना आरोग्यातील कुंडली पाहाणे,विवाहासंबधी कायदे आणि मानसिकते बरोबर,अनिष्ठ रुढी परंपरांना फाटा देऊन बौद्धिक व वैचारिक पातळीवर कार्य करणारी विवाह संस्था म्हणून आज या सकल मराठा संस्थेकडे पाहिले जाते.

संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात मोफत वधु- वर थेट-भेट परिचय मेळावे,युवकांना व्यवसाय मार्गदर्शन शिबिर,महिला उद्योजक मेळावे,रक्तदान शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, सध्याच्या लाॅकडाऊन परिस्थितीत गरजूंना घरबसल्या व्हाटसअॅप व्दारे अनुरुप स्थळे उपलब्ध करुन शेकडो विवाह जुळविण्याचा प्रयत्न यशस्वी करुन अनेक घटोस्पोटीत,विधवा पुर्नरविवाह इत्यादी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले असुन राज्यातील मराठा समाजाबरोबर समन्वय आणि अभ्यास व मार्गदर्शन व संघटन विवाह संस्थेच्या माध्यमातून अविरत चालू आहे.सकल मराठा विवाह संस्थेने राज्यभरातील मराठा समाजाच्या विविध संघटना व संस्थेबरोबर सतत समन्वय ठेवला असून विविध संघटनेचे पदाधिकारी अतिशय सक्रियपणे या सकल मराठा विवाह संस्थेच्या माध्यमातून राज्य व देश पातळीवर कार्यरत आहेत तसेच समाजाच्या विविध संघटनेच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना, नवं नेतृत्व निर्माण, वैचारिकता, संशोधनात्मक, यासाठी हि विवाह संस्था सकल मराठा समाजासाठी समर्पित आहे. राज्यात या विवाहसंस्थेचा सामाजिक कार्याचा विस्तार अधिक व्हावा व मराठा समाजातील पालकांना घर बसल्या अनुरूप स्थळे उपलब्ध व्हावीत यासाठी सकल मराठा संस्थेचे मुख्य समन्वयक जयकिसन वाघपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्थेचे,संघटनेचे पदाधिकारी समर्पित कार्य करीत असून हे कार्य निरंतर कार्यरत राहणार आहे. या विवाह संस्थेत कोणीही संस्थापक किंवा मालक नसेल तर समाजासाठी आपण काही देणे लागतो हीच भावना जोपासली जाते आणि हाच भाव कायम राहील यापुढे आम्ही सकल मराठा विवाह संस्थेचे राज्य कार्यकारिणी लवकरच गठित करीत असून या विवाह संस्थेने उभी केलेली चळवळ निरंतर चालत राहणे गरजेचे आहे त्यासाठी नवीन पिढीच्या विचाराने, बौद्धिकतिने, शिक्षणाने व व्यवसायाने परिपूर्ण असतील आणि नोकरी व व्यवसायाने स्वावलंबी असतील इत्यादी सर्व प्रकारे संपन्न व सक्षम आशी राज्यभरातील ज्येष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची फळी तयार व्हावी पुढे चालून याच युवकांनी या चळवळीचे नेतृत्व करावे या भावनेने आम्ही सकल मराठा विवाह संस्थेची कार्यकारिणी गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आम्ही विविध क्षेत्रात कार्यरत आणि यशस्वी व्यावसायिक, वधु-वर सुचक केंद्र व समाजातील ज्येष्ठ नागरिक व युवकां सोबत चर्चा केली आणि सखोल चर्चेअंती हा निर्णय घेतला आहे.

समाजामध्ये सकल मराठा विवाह संस्थेच्या माध्यमातून एक चांगले काम करण्याचा त्यांचा मनोदय व्यक्त केला असून ते भविष्यात समाजासाठी एक सक्षम युवकांची फळी निर्माण करण्याचा संकल्प करीत आहेत लवकरच विवाह संस्थेचे राज्य समन्वयक जयकिसन वाघ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व कार्यकारी मंडळाच्या चर्चेनुसार सकल मराठा विवाह संस्थेची राज्य कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे अशी माहिती लक्ष्मणराव मडके यांनी दिली.