
🔹प्रहार संघटनेच्या प्रयत्नाला यश
✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी) मो:-९३०७८९६९४९
नायगाव(दि.7सप्टेंबर):-ग्राम पंचायत कार्यालय, कृष्णुर ता. नायगाव जि. नांदेड च्या वतीने सन २०१९-२० दि.०६ सप्टेंबर २०२० रोजी १४ व्या वित्त आयोगातुन ५% निधिचे वाटप करण्यात आले त्यामुळे कृष्णुर येथील दिव्यांगांतुन आनंद व्यक्त होत आहे. प्रत्येकी २५०० ₹ एकुण ४२ दिव्यांगांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहीती साईनाथ बोईनवाड यांनी माध्यमांना दिली.
या निधी वितरणाच्या कार्यक्रमास कृष्णुर सौ. विजयश्री पंढरीनाथ कमठेवाड जिल्हा परिषद सदस्या श्री. मल्लिकार्जुन डांगे सरपंच, श्री. धीरज जाधव उपसरपंच, श्री. दत्तात्रय जाधव, श्री. प्रशांत नादरे एम. एम. शेख ग्रामसेवक, साहेबराव जाधव, तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे नांदेड जिल्हा सचिव मारोती मंगरूळे, नायगाव तालुका अध्यक्ष श्री. साईनाथ बोईनवाड व गावातील दिव्यांग मिलींद कागडे, सुनील राठोड, एस. टी. जाधव, बालाजी जाधव, श्रीकांत जाधव व ईतर दिव्यांग बांधव हजर होते.