अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृह अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविड-19 काळात प्रवेश फिस आकारू नये

  58

  ?बीड पूर्व वंचित बहुजन आघाडीची मागणी

  ✒️नवनाथ पौळ(प्रतिनिधी केज तालुका)
  मो:-8080942185

  केज(दि.7सप्टेंबर):- वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा ( पुर्व) यांच्यावतीने अंबाजोगाईतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. खडकभावी सर यांची भेट घेत कोरोनाच्या काळातील सामान्य नागरिकांवर भयंकर आर्थिक परिणाम पडले आहेत . यामुळे पुढे वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फिस मध्ये सूट देण्यात यावी व तसे जाहिर करुण उपकृत करावे अन्यथा तसे न केल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलना करण्याचा इशारा देण्यात आला.
  निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन आघाडी बीड पूर्व चे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ डोंगरे , अंबाजोगाई तालुकाध्यक्ष जांबुवंत उर्फ संजय तेलंग , उपाध्यक्ष ऍड .सुभाष जाधव साहेब , बाबासाहेब मस्के( केज) , अनिल कांबळे , नितीन बप्पा सरवदे , पत्रकार नवनाथ पौळ , राहूल गायकवाड, तुकाराम देवळकर,अक्षय भुंबे व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.