मानव निर्मित महापुराने एका क्षणात शैक्षणिक संस्थेला केले बरबाद

29

🔸यंग इंजिनीअर्स एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित विविध विद्या शाखेचे करोडो रुपयाचे झाले नुकसान

🔹शैक्षणिक दस्ताऐवज झाले खराब – संस्थेला भेट देण्यात प्रशासन सौजन्याचा अभाव

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.8सप्टेंबर):- मानव निर्मित महापूराने सगळीकडे भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. व कुणालाच नुकसानी पासून सोडले नाही, या भयानक महापुराच्या जबडयात सापडलेली ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा रोडवरील यंग इंजिनीअर्स एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, संस्थे चा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे.

या पुराने मोठ्या प्रमाणात गाळ या संस्थेच्या बिल्डिंग मध्ये आला आहे हे सर्व साफ करण्यासाठी टीचींग स्टाफ आणि नॉन टिचींग स्टाफ साफ सफाई करण्याचा कामात लागले आहे. व मोठ्या प्रमाणात नुकसानीचा ताण डोक्यावर पडलेला आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी (डी.फार्म) (१.५० कोटी नुकसान), महाराष्ट्र इन्स्टिट्युटऑफ फार्मसी(बी.फार्म) (२ कोटी नुकसान),महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक (१.५० कोटी नुकसान), महाराष्ट्र आयटी बेटाळा (६० लक्ष) ई. तसेच सर्व कागदपत्र महापुराने बिनकाम केले आहे.अशा प्रकारे महापुराणे एका क्षणात सर्वकाही नुकसान केले.

एवढ सार होऊन सुध्दा प्रशासनाने फिरकून सुध्दा बगितल नाही आहे. यामध्ये संस्थेची काहीही चूक नसताना, नुकसान झाली आहे. तरी हे सर्व नुकसान लक्ष्यात घेता प्रशासनाने त्वरित शहानिशा करून सर्वे करून लवकरात लवकर मदत करावी. अशी संस्थेचे संस्थापक श्री.देवेंद्र मुरारी पिसे यांची विनंती आहे.