गेवराई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांचा सत्कार

6

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.8सप्टेंबर):-पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांचा सत्कार रयत शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, अनेक गावच्या ग्रामस्थांच्या, मित्र परिवार उपस्थितीत अनेक प्रश्नावरती चर्चा करून काही गावातील जनतेच्या समस्या रस्ता, दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात यावी, शेतकऱ्यांना मदताचा धाव मिळावा. हापसा, किराणा साहित्य, निधी वाटप, नाली दुरुस्ती, सिमेंट रस्ता, ग्रामपंचयतीमार्फत भेटणारे सर्व पत्रक, नळ पाणीपुरवठा दुरुस्ती, फिल्टर दुरुस्ती आदी विषयांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

यानंतर गावपातळीवरील अधिकाऱ्याची पाठराखण करणार नाही ,दोषींवर कठोर शासन केले जाईल जनतेच्या विकासासाठी सर्व विभागातील योजना प्रभावी राबविल्या जातील याकडे लक्ष द्यावे लागेल.सानप यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील नानासाहेब ठोसर पाटील बीड जिल्हा प्रमुख . तालुकाध्यक्ष बाबूराव भोईटे, सरफराज पठाण आदि उपस्थित होते.