राज्यस्तरीय हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी खासदार श्री.हेमंत पाटील यांची निवड

29

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

हिंगोली(दि.8सप्टेंबर):- राज्यातील हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.हिंगोली येथे हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यात यावेयाकरिता खासदार हेमंत पाटील मागील काही दिवसापासून सतत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. याबाबत राज्य शासनाने 22 जुलै रोजी बैठक आयोजित करुन अभ्यास समिती गठित करण्याचे सांगितले होते. त्यानुसार अभ्यास समिती तयार करण्यात आले आहे.खासदार हेमंत पाटील यांचे सातत्यपूर्ण पाठपुरावा ची ही फलश्रुती म्हणावी लागेल.

त्यातील हिंगोली नांदेड बुलढाणा यवतमाळ वाशीम सांगली सातारा चंद्रपूर व परभणी या जिल्ह्यामध्ये हळदीचे पीक जास्त प्रमाणात घेतले. परंतु प्रक्रिया साठवणूक विक्रीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे राज्यातील हळद इतर राज्यांमध्ये निर्यात केली जाते,हळदीच्या लागवडीपासून प्रक्रिया विक्रीपर्यंत सर्व सुविधा राज्यातच उपलब्ध झाल्यास राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल आणि हळद लागवडी पासून प्रक्रिया आणि विक्री पर्यंत येणाऱ्या अडचणी विचारात घेता खासदार हेमंत पाटील यांनी मागील अनेक दिवसांपासून केंद्रीय,संसदीय व वाणिज्य आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच या अनुषंगाने 22 जुलै रोजी राज्यशासनाने बैठक आयोजित करून लवकरच हळद प्रक्रिया आणि संशोधन अभ्यास समिती गठित करण्यात येणार असल्याचे सांगितले होते त्याच बैठकीची फलश्रुती म्हणून अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची तर सचिवपदी कृषी आयुक्तालय पुणे विभाग (फलोत्पादन) संचालक यांची निवड केली आहे.

तर सदस्य म्हणून पुणे कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्यासह परभणी, दापोली, राहुरी या कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक, स्पायसेस बोर्डाचे उपसंचालक, हळद आयात-निर्यात संघाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र कृषी उद्योग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी, पणन मंडळाचे संचालक,अन्न औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी, हळद उत्पादक शेतकरी, उत्पादक कंपनी यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील हळद उत्पादक शेतकरी यांच्याशी संपर्क साधून लेखी अथवा प्रत्यक्ष स्वरूपात समस्या मागवून त्यावर सखोल चर्चा करून त्यावर काय उपाययोजना करता येतील याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे हिंगोली येथील हळद संशोधन प्रक्रिया महामंडळाचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीन विकासासाठी खासदार हेमंत पाटील सदैव कार्यशील असल्याचे यावरून दिसून येते.